Ind vs SA: 5वा टी20 सामना होणार रद्द? जाणून घ्या कसे असणार त्या दिवशीचे हवामान

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका 3-1 ने आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ ही मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्यासाठी मैदानात उतरेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघ या सामन्यात आपले 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतील. मात्र, त्यासाठी सामना होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच 19 डिसेंबरला अहमदाबादचे हवामान कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

19 डिसेंबरला अहमदाबादमध्ये हवामान स्वच्छ राहणार आहे. या दिवशी येथील तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर पावसाचा अंदाज जवळपास शून्य टक्के आहे. मात्र, या दरम्यान ताशी 11 किमी वेगाने वारे वाहतील. हवामानाचा हा अंदाज पाहता, सामना पूर्ण खेळवला जाणार हे स्पष्ट झाले आहे. मैदान मोठे असल्याने गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते, परंतु येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक पूरक असते. अशा परिस्थितीत चेंडू आणि बॅटमधील चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. दोन्ही संघांनी आतापर्यंत या मालिकेत सरासरी कामगिरी केली आहे, त्यामुळे शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपला खेळाचा दर्जा अधिक उंचावावा लागेल

भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, शाहबाज अहमद, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.

Comments are closed.