कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार का? पक्षाची पुढील राजकीय वाटचाल काय असेल? अभिजीत दीपके म्हणाल
Cockroach Janta Party: सध्या सर्वत्र कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या 6 दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर 100 लाख (10M) फॉलोअर्सचा आकडा पार केला. कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकलं. तर काही तासांत काँग्रेसच्या फॉलोअर्सलाही कॉकरोच जनता पार्टी मागे टाकणार असल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) या मराठी मुलाने स्थापन केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची चर्चा राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. अभिजीत दीपके यांनी त्यांच्या या कॉकरोच जनता पार्टीची स्थापना, पुढील वाटचाल याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी एबीपी माझाशी बोलताना सांगितल्या आहेत.
झुरळ जनता पार्टी: झुरळ जनता पार्टी कशी सुरू झाली
कॉकरोच जनता पार्टी कशी सुरू झाली याबाबत त्याचे संस्थापक अभिजित दीपके यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, भारताचे सरन्यायाधीश आहेत, त्यांना असं का बोलावं वाटलं, ते सिस्टम विरोधात बोलताना, व्यवस्थेच्या विरोधात बोलतात ते कॉकरोच किंवा पॅरासाईट आहेत. मला वाटतं त्यांचं जे लोकशाहीमध्ये कार्य आपल्या अधिकारांचं रक्षण करणं, त्यातील एक अधिकार आहे बोलण्याचा अधिकार, ज्यांचं काम आहे बोलण्याच्या अधिकाराची रक्षा करणे मग ते असं कसं बोलू शकतात. जे बोलत आहेत ते कॉकरोच आणि पॅरासाईट आहेत. ते खूपच धक्कादायक वक्तव्य होतं. त्यामुळं आम्ही ही कॉकरोच जनता पार्टी सुरू केली.
Cockroach Janta Party: राजकीय पक्षामध्ये देखील रूपांतर होणार आहे का?
तर मिळत असलेला मोठा प्रतिसाद आणि बाकी गोष्टींमुळे आता ही मोहिम एका चळवळीमध्ये रूपांतरीत होताना दिसत आहे, पण याचं राजकीय पक्षामध्ये देखील रूपांतर होणार आहे का? या प्रश्नावरती उत्तर देताना अभिजित दीपके म्हणाले, नक्कीच होईल, पण मला आत्ता सांगण थोडं अवघड आहे, कारण मला माहिती आहे त्यानुसार, आम्ही ही आमची कॉकरोच जनता पार्टी विचार करून सुरू केलेली नव्हती. भारताचे सरन्यायाधीश यांचं हे वक्तव्य आलं नसतं तर आज मी इथे तुमच्यासोबत मुलाखतीला बसलो नसतो. आम्ही प्लँनिंग करून काही ठरवून केलेलं नव्हतं. आताच तीन ते चार दिवस झालेले आहेत. आमच्याकडे एक करोड दहा लाख लोक आली आहेत, सोशल मिडीयावरती, तर या सर्व लोकांशी बोलणं आणि प्लँनिंग करणं खूप अवघड आहे, कारण की, आता तीन ते चारच दिवस झाले हे सगळं सुरू करून, आम्ही त्या लोकांशी बोलू, प्लॅन करू, संवाद साधू, त्यांच्याकडून सजेशन घेऊ, त्यांचे इनपूट घेऊ, त्यांचा इतका राग का आहे? आत्ताच्या सरकारवरती आणि सिस्टम वरती, तोपर्यंत आम्ही समजून घेऊ शकत नाही. त्यांच्या अपेक्षा काय आहेत. त्यांचे चिंता काय आहेत, तोपर्यंत आम्ही काही ठरवू शकत नाही. त्यांची तक्रारच ही आहे की, कोणताही पक्ष आणि कोणतंच सरकार समजून घ्यायला तयार नाही, आमचं ऐकायला तयार नाही, आमचे प्रॉब्लेम समजून घ्यायला तयार नाही, तर मला तीच चूक नाही करायची. बाकी पक्षांनी जी चूक केली, ती करायची नाही, मला त्यांना समजून घ्यायचं आहे. त्यांना समजून घेणं आणि त्यांचं ऐकणं सर्वात जास्त गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही पुढचं पाऊल ठरवू, असंही अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.