IPL 2025 मध्ये नवे नियम, गोलंदाजांना मिळणार मोठा फायदा!
आयपीएल 2025 स्पर्धेला 22 मार्च पासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी गुरुवार रोजी सर्व संघांच्या कर्णधारांची मीटिंग घेण्यात आली. ही मीटिंग भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या हेडकॉटर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आयपीएल स्पर्धेतील काही नियमांना बदलण्यात येणार आहे, ही गोष्ट समोर येत आहे. तसेच गोलंदाजांविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने चेंडूवर लाळ लावण्यास पूर्णपणे बंदी घातली होती. पण आता या नियमाबद्दल एक मोठा बदल समोर येत आहे.
आता गोलंदाज सामन्यादरम्यान चेंडूवर लाळ वापरू शकतील. याबरोबरच अनेक काही नियमांना बदलण्यात आले आहे.
क्रिकबजच्या एका रिपोर्टनुसार मीटिंगमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये चेंडूवर लाळ वापरण्यास सूट देण्यात आलेली आहे. या आधी बीसीसीआयने यावर बंदी घातली होती पण आता यामध्ये बदल केला आहे. त्याचबरोबर एका मोठ्या नियमात अजून बदल करण्यात आलेला आहे, सामन्यादरम्यान दुसऱ्या चेंडू बद्दल नियम बनवला आहे. तो नियम असा आहे की, दुसरा चेंडू आयपीएल सामन्याच्या दुसऱ्या पारीमधील 11 व्या षटकानंतर येईल. हा नियम रात्रीचे हवामान बघून घेण्यात येईल.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने कोरोना व्हायरसमुळे चेंडूवर लाळ वापरण्यास बंदी घातली होती , तसेच आयसीसीने सुद्धा यावर बंदी घातली होती. पण आता या नियमांना बदलण्यात आले आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मागच्या दिवसात लाळ वापरण्यास घातलेली बंदी काढण्याची विनंती केली होती.
Comments are closed.