IND vs PAK: फिरकीपटूंची जादू की फलंदाजांचा तडाखा? जाणून घ्या भारत-पाक सामन्याआधी खेळपट्टीचा अंदाज!

आज पुन्हा एकदा आशिया कप 2025 (Asia Cup) स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोणत्याही क्रिकेट सामन्यात खेळपट्टीची भूमिका खूप महत्त्वाची असते. आजच्या सामन्यातही खेळपट्टी निर्णायक ठरणार आहे. जाणून घ्या दुबईच्या खेळपट्टीबद्दल सविस्तर माहिती.

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. या महामुकाबल्याचा टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होईल. सामना तुम्ही टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहू शकता. डीडी फ्री डिशवरही या सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना Sony LIV App वापरता येईल.

या मैदानावर या हंगामात फिरकीपटूचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. आजही फिरकीपटू प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. सुरुवातीला फलंदाजांना धावा करणे तुलनेने सोपं असतं, पण चेंडू जुना झाल्यानंतर फिरकीपटूंना मदत मिळते. फिरकीपटूंसमोर मोठे फटके मारणे इथे अवघड ठरतं. इथल्या हवामानामुळे ओस फारसा परिणाम करत नाही.

आजच्या सामन्यातही दुबईची खेळपट्टी तुलनेने मंद राहणार आहे. खेळपट्टीचा पृष्ठभाग कोरडा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला चेंडू व्यवस्थित बॅटवर येईल, पण जसजसा चेंडू जुना होईल तसतसा तो थोडा थांबून बॅटवर येईल. त्यामुळे धावा करणे कठीण होईल. आज ज्या खेळपट्टीवर सामना होणार आहे, त्याच खेळपट्टीवर भारत-पाकिस्तानचा लीग स्टेजमधला सामना खेळवला गेला होता.

आशिया कप 2025 स्पर्धेचा (Asia Cup 2025) ब्रॉडकास्ट पार्टनर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आहे. त्यामुळे तुम्ही टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स1, सोनी स्पोर्ट्स 3 (हिंदी), सोनी स्पोर्ट्स 4 आणि सोनी स्पोर्ट्स 5 या चॅनेल्सवर थेट सामना पाहू शकता. मोबाईलवर पाहण्यासाठी सोनी लिव्ह अँप उपलब्ध आहे. मात्र, ही दोन्ही ठिकाणं मोफत नाहीत.
मोफत सामना पाहण्यासाठी तुम्ही DD Free Dish वर भारत-पाक सामना पाहू शकता. त्याचबरोबर प्ले-स्टोअरवर CRICFy TV App उपलब्ध आहे. या अॅपवर आशिया कप 2025 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण होत आहे आणि त्यासाठी कोणत्याही सब्स्क्रिप्शनची गरज नाही.

Comments are closed.