IND vs ENG; दुसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार? कशी असेल कटकची खेळपट्टी? जाणून घ्या एका क्लिकवर

भारत-इंग्लंड (India vs England) दोन्ही संघात सध्या 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला वनडे सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 विकेट्सने धुव्वा उडवला. दरम्यान दोन्ही संघातील दुसरा सामना उद्या (9 फेब्रुवारी) कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल.

3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच दुसरा सामना जिंकून भारत विजयी आघाडी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. परंतु, इंग्लंडसुद्धा दुसऱ्या सामन्यात पुनरागमनाच्या तयारीत असेल. दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी (ICC Champions Trophy 2025) जोरदार खेळ करण्याच्या प्रयत्न करतील. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी त्या मैदानावरील (कटक) खेळपट्टी कशी असेल हे जाणून घेऊया.

नागपूरच्या खेळपट्टी सारखीच कटकची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करते. त्यामुळे पाहुण्या संघाच्या फलंदाजांना कटकच्या खेळपट्टीवर धावा करणे एवढे सोपे असणार नाही. कारण इंग्लंडच्या फलंदाजांसमोर अनुभवी रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) आव्हान असेल.

दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि इंग्लंड संघ 108 वेळा आमने-सामने आले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारताने 59 वेळा तर इंग्लंडने 44 वेळा विजय मिळवला आहे. कटकच्या मैदानाबद्दल बोलायचे झाल्यास, या मैदानावर दोन्ही संघाने 10 सामने खेळले आहेत. त्यातील 6 सामन्यात भारताने, तर 4 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11-

भारत- रोहित शर्मा (कर्नाधर), यशसवी जयस्वाल, विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, आर्शदीप सिंग, मोहम्मद शमी

इंग्लंड- बेन डॉकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्नाधार), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रिडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

महत्त्वाच्या बातम्या-

कटकच्या मैदानावर भारताचा दबदबा, विरोधकांचा पराभव निश्चित! पाहा आकडेवारी
फिलिप्सने पाकिस्तानला ठोकले! शतकी खेळीने शेवटच्या षटकांत सामन्याची दिशा बदलली
विराट कोहलीच्या फिटनेसवर मोठी बातमी! दुसऱ्या वनडेसाठी उपलब्ध?

Comments are closed.