Asia Cup: भारत-पाक सामन्यात फलंदाज की गोलंदाज कोण मारणार बाजी? जाणून घ्या खेळपट्टीचा अंदाज!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेतील सर्वात मोठ्या सामन्याला फक्त थोडाच वेळ बाकी आहे. आशिया कप 2025 च्या सर्वात ब्लॉकबस्टर सामन्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. 14 सप्टेंबरच्या संध्याकाळी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) जोरदार टक्कर होणार आहे. जेव्हा हे दोन्ही देश एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो.
प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी पूर्ण ताकदीने खेळतो. या वेळीही दृश्य वेगळे नसेल. यंदा दोन्ही संघांचे कर्णधार पहिल्यांदाच आशिया कपच्या रणांगणात संघाचे नेतृत्व करणार आहेत. भारताची कमान सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) हातात आहे, तर पाकिस्तान संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सलमान आगावर (Salman Aaga) आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा सहावा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. दुबईत सहसा गोलंदाजांचे साम्राज्य राहते. सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळते. हळूहळू सामना पुढे सरकला की फिरकी गोलंदाज आपले कौशल्य दाखवतात. चेंडू बॅटवर थोडा उशीराने येतो, त्यामुळे फलंदाजांना धावा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मात्र संध्याकाळी ओस पडल्याने धावा बनवणे सोपे होते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात टार्गेट साध्य करणे तुलनेने सोपे राहते.
दुबईच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 111 सामने झाले आहेत. त्यापैकी 51 सामने पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तर 59 सामने दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना जिंकले गेले आहेत. याचा अर्थ दुबईत टॉस जिंकून आधी गोलंदाजी करणे जास्त फायदेशीर ठरते.
Comments are closed.