‘थ्री इडियट्स’चा सिक्वेल येणार का? आर. माधवन काय म्हणाला, वाचा
थ्री इडियट्स हा सिनेमा 2009 मध्ये आला. समीक्षकांनी या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर उचलून धरले होते. प्रेक्षकांच्या मनात आजही हा सिनेमा जिवंत आहे. गेल्या काही दिवसांपासून या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या सिक्वेलबद्दल बरीच होती. राजकुमार हिरानी या चित्रपटावर काम करत असल्याचीही कुणकुण लागली होती. मुख्य म्हणजे यातील प्रमुख तीन कलाकार आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी सुद्धा याच्या सिक्वेलवर काम करण्यास उत्सुक होते. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र आमिर आणि माधवन या दोघांनी आता सिक्वेलची शक्यता कठीण असल्याचे म्हटले आहे.
बॉलीवूड हंगामासाठी सुभाष के. झा यांना दिलेल्या मुलाखतीत माधवन म्हणाला, “‘थ्री इडियट्स’चा सिक्वेल बनवणे ही कल्पना नक्कीच छान आहे. परंतु आता आमच्या तिघांचेही वय वाढले आहे. त्यामुळे आम्ही सिक्वेलमध्ये परफेक्ट बसणार नाही. एक मात्र नक्की आमचे आत्ताचे आयुष्य कसे आहे हे मात्र सिक्वेलमध्ये असू शकले असते.. परंतु हे केवळ कल्पनेपुरते मर्यादीत आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा सिक्वेल निघणे हे फार कठीण दिसत आहे.
आमिर खान म्हणाला की तो ‘थ्री इडियट्स’चा सिक्वेल करू इच्छितो, पण त्याने असेही म्हटले की अद्याप कोणीही त्याच्याशी संपर्क साधलेला नाही. तो म्हणाला, “आम्हाला तो चित्रपट बनवण्यात खूप मजा आली! माझे पात्र, रँचो, माझे नेहमीचे आवडते पात्र आहे. लोक अजूनही रँचोबद्दल बोलतात. तर, हो, मला सिक्वेल करायला आवडेल. पण कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही.”
थ्री इडियट्स हा जगभरात ४०० कोटी रुपयांची कमाई करणारा आणि परदेशात बॉक्स ऑफिस कामगिरीसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित करणारा पहिला हिंदुस्थानी चित्रपट होता. हा चित्रपट बराच काळ हिंदुस्थानातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला. गेल्या काही वर्षांत, टीव्ही आणि ओटीटी स्ट्रीमिंगवर वारंवार प्रसारित होणाऱ्या चित्रपटांमुळे चाहत्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या चित्रपटात बोमन इराणी, करीना कपूर, ओमी वैद्य आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Comments are closed.