आशियामध्ये पुन्हा एकदा कोविडची लाट? हाँगकाँग, सिंगापूरमध्ये रुग्णांची झपाट्याने वाढ

हाँगकाँग, सिंगापूर मध्ये सध्याच्या घडीला कोविड – 19 ची धोक्याची घंटा वाजली आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोविड-19 चे रुग्ण वाढत असल्याचे स्पष्ट केलेले आहे. सध्याच्या घडीला याठिकाणी कोविड-19 संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, संपूर्ण आशियामध्ये पुनरुज्जीवित लाट येण्याचे संकेत आता मिळाले आहेत. शहराच्या आरोग्य संरक्षण केंद्राच्या संसर्गजन्य रोग शाखेचे प्रमुख अल्बर्ट औ यांच्या मते, हाँगकाँगमध्ये कोविड विषाणूंचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यांनी सांगितले की, कोविड-19 बाधित पाॅझिटिव्ह असणाऱ्या नमुन्यांची टक्केवारी गेल्या वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.
केंद्राकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गंभीर प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. यामध्ये काहीजणांनी जीव देखील गमावला आहे. या मृत्यूच्या आकड्याने एका वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 31 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या सर्वोच्च संसर्ग पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. कॉन्सर्टच्या अधिकृत वेइबो अकाउंटवरील पोस्टनुसार, कोविड-19 ची लागण झाल्यानंतर, हाँगकाँगचे गायक इसन चॅन यांनी या आठवड्याच्या अखेरीस नियोजित असलेल्या काओसुंग, तैवानमधील त्यांच्या आगामी संगीत कार्यक्रम रद्द केले.
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने, या महिन्यात जवळजवळ एका वर्षात संसर्गाच्या संख्येबाबत पहिले अपडेट उघड केले आहे. यामध्ये सध्याच्या घडीला सिंगापूरमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात अंदाजे रुग्णसंख्या 28 टक्क्यांनी वाढून 14 हजार 200 इतकी झालेली आहे. तसेच रुग्णालयामध्ये दररोज नवीन रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण 30 टक्के इतके वाढले आहे.
लोकसंख्येची प्रतिकारशक्ती कमी होणे यासारखे घटक या वाढीस कारणीभूत ठरू शकतात. परंतु सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या घडीला साथीच्या आजारांमुळे संसर्ग अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे. परंतु या वाढीमध्ये अजून गंभीर स्थिती मात्र उत्पन्न झालेली नाही. प्रामुख्याने थंडीच्या सीझननंतर, उन्हाळा सुरु होण्याआधी कोविड-19 चे विषाणू हे पुनरुत्पादीत होताना दिसतात.
Comments are closed.