विराट कोहली सिडनी वनडे नंतर निवृत्ती घेणार? जाणून घ्या सुनील गावस्कर काय म्हणाले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये विराट कोहली खातंही उघडू शकला नाही. पहिल्या सामन्यात त्याने 8 चेंडू, तर दुसऱ्या सामन्यात 4 चेंडू खेळून शून्यावर (0) आउट झाला. एडिलेड वनडेत शून्यावर बाद झाल्यानंतरच त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर त्याचा सिडनी वनडे निवृत्ती घेण्याचा विषयाची खूप चर्चा रंगली आहे.

विराटच्या निवृत्तीबाबत चर्चा होण्याचे एक कारण म्हणजे एडिलेड वनडेत खातं न उघडता बाद झाल्यानंतर पवेलियनमध्ये परतताना त्याने हात वर केला. हे फक्त चाहत्यांचे अभिनंदन स्वीकारण्यासाठी होते की त्याने निवृत्तीची हिंट दिली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हाच विराटचा फोटो सोशल मीडियावर वारंवार शेअर केला जात आहे. आधीच विराटने टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता एडिलेड सामन्यातला हा वायरल फोटो त्याच्या वनडे निवृत्तीला देखील ‘ट्रेंडिंग टॉपिक’ बनवतं आहे.

विराटचा हात वर करण्याचा हा इशारा अनेक मोठे प्रश्न निर्माण करत आहे. यावर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले, विराट कोहलीच्या 14,000 हून अधिक वनडे धावा आहेत, 51 शतकं आणि कसोटीमध्ये 31 शतके आहेत. त्याने हजारो धावा केल्या आहेत. 2 अपयशांवर त्याच्यावर जास्त टीका होऊ नये. अजून बरेच क्रिकेट बाकी आहे.

विराट कोहलीने 304 वनडे सामन्यांमध्ये 14,181 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणारा तो फलंदाज आहेत. 73 अर्धशतकं आणि सरासरी 57.41 ठेवली आहे.

Comments are closed.