विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार का? जाणून घ्या बीसीसीआयने दिली मोठी हिंट!
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील (ODI Series IND vs SA) वनडे मालिकेचा पहिला सामना रांची येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने (Team india) 17 धावांनी रोमांचक विजय मिळवला. या विजयात टीम इंडिया स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) धमाकेदार शतक ठोकत मोठा वाटा उचलला. त्याच्या या उत्कृष्ट खेळीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारही (Player of the match) मिळाला, आणि हे अवॉर्ड घेताना किंग कोहलीने बीसीसीआयला विजय हजारे ट्रॉफीबाबत एक मोठा संकेत दिला.
कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आता फक्त वनडे फॉरमॅट खेळत आहे. त्यामुळेच बीसीसीआयला वाटतंय की कोहलीने विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये खेळावं. मात्र, कोहलीने खूप काळापासून या स्पर्धेत भाग घेतलेला नाही.
रांची वनडे सामन्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार घेताना कोहली म्हणाला, जास्त तयारी करण्यावर माझा विश्वास नाही. माझं संपूर्ण क्रिकेट मानसिक ताकदीवर चालतं. मी जर मानसिकदृष्ट्या फ्री असेन, तर ते माझ्या बॅटिंगमध्येही दिसतं. मी मेंटली चांगलं वाटत असेन तर माझं नैसर्गिक खेळ मी खेळू शकतो.
कोहली मागील 10 वर्षांपासून अतिशय फिट आहे, त्यामुळे त्याच्या फिटनेसबद्दल कोणताही प्रश्न नाही. सामना खेळण्याची फिटनेस (मॅच फिटनेस) याबद्दलही त्याने स्पष्ट उत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या तरी कोहली विजय हजारे ट्रॉफीत खेळेल, अशी शक्यता खूपच कमी दिसते.
मात्र, वनडे मालिका पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबत बैठक घेऊ शकते. या बैठकीत तो विजय हजारे ट्रॉफीत खेळायचे की नाही, याबद्दल चर्चाही होऊ शकते.
रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा मात्र मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफी 2025 खेळण्यासाठी तयार आहे.
Comments are closed.