दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक, तरीही न्यूझीलंड वनडे मालिकेतून यशस्वी जयस्वाल बाहेर! जाणून घ्या नेमकं कारण

यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) भारताच्या शेवटच्या एकदिवसीय (ODI) सामन्यात शानदार शतक ठोकले होते आणि त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कारही मिळाला होता. तरीही, 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याच्या निवडीवर टांगती तलवार आहे.

यशस्वीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या वनडेत 121 चेंडूत 116 धावांची खेळी केली होती. मात्र, आता शुबमन गिल (Shubman gill) संघात परतणार असल्याने जयस्वालची जागा अडचणीत आली आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जखमी झाला होता, त्यामुळे त्याला वनडे मालिकेला मुकावे लागले.
टी-20 वर्ल्ड कप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत गिल खेळणार नसला तरी, वनडे मालिकेसाठी तो कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma & Shubman gill) आणि शुबमन गिल ही जोडी सलामीला येते आणि तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) असतो. अशा स्थितीत जयस्वालला संघात स्थान मिळणे कठीण दिसत आहे.

बीसीसीआयने 26 वर्षीय शुबमन गिलला यावर्षी कसोटी आणि वनडेचा कर्णधार बनवले आहे. त्याची कामगिरी पाहता त्याचे पारडे जड वाटते. शुबमन गिलने 58 वनडे सामन्यात 2818 धावा करत 8 शतके, 15 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच सलामीवीर म्हणून त्याने 53 सामन्यात 2552 धावा केल्या आहेत त्याची सर्वोच्च धावसंख्या 208 धावा केल्या. यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) आतापर्यंत केवळ 4 वनडे सामने खेळले असून त्यात एका शतकासह 171 धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा संभाव्य संघ (Predicted Squad):
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Comments are closed.