Asia Cup 2025 : टीम इंडियाची प्लेइंग-11 जवळपास ठरली, 8 खेळाडूंची जागा पक्की!

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धा अवघ्या काही दिवसातच सुरू होईल. 9 सप्टेंबरपासून यूएईच्या मैदानावर 8 देशांमध्ये आशिया कपची ट्रॉफी जिंकण्यासाठी जबरदस्त लढत होणार आहे. भारतीय संघाची घोषणा निवडकर्ते 19 ऑगस्टला करू शकतात, अशी चर्चा आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन (Sanju Samson) ही पहिली पसंती ठरू शकते. चला पाहूया, या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग-11 कशी असू शकते.

ओपनिंगसाठी अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि शुबमन गिल (Shubman gill) मैदानात उतरताना दिसू शकतात. त्याच वेळी, तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी संजू सॅमसन किंवा सूर्यकुमार यादव घेऊ शकतो. अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांचा सहभाग जवळपास निश्चित मानला जात आहे.

यूएईमधील परिस्थिती लक्षात घेता वॉशिंग्टन सुंदरलाही (Washington Sundar) प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकते. पण, संघ व्यवस्थापन तिलक वर्मा (Tilak Verma) आणि रिंकू सिंह (Rinku Singh) यांच्यातून कोणाला संधी देते, हे पाहणे रोचक ठरणार आहे.

Comments are closed.