ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीलाच कोहली-रोहितसह शुबमन गिलला धक्का, चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण!

वनडे मालिकेत शानदार कामगिरी करण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli & Rohit Sharma) ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. किंग कोहली आणि हिटमॅन या दोघांचा कंगारू मैदानावरचा विक्रम नेहमीच अफलातून राहिला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात पोहोचताच कोहली-रोहितसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

ही बातमी त्यांना आयसीसीकडून मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या नव्या रँकिंगमुळे शुबिमन गिलच्याही (Shubman gill) कपाळावर आठ्या उमटल्या आहेत. भारताला ऑस्ट्रेलियात 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.

दरम्यान, आयसीसीने वनडे क्रिकेटची नवी रँकिंग जाहीर केली आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीला तोटा सहन करावा लागला आहे. रोहित दुसऱ्या स्थानावरून एक पायरी खाली घसरला असून आता तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर कोहलीलाही एक स्थानाचं नुकसान झालं असून तो चौथ्या वरून पाचव्या स्थानी गेला आहे.

म्हत्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या 7 महिन्यांपासून रोहित आणि विराट यांनी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत हे दोघे पुन्हा फलंदाजी करून रंगत आणताना दिसणार आहेत. विराट आणि रोहितसोबतच शुबमन गिलसाठीही ही नवी रँकिंग काहीशी चिंताजनक ठरली आहे. वनडे क्रिकेटमध्ये गिलच्या नेतृत्वावर आता धोका निर्माण झाला आहे.

अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरानला बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत केलेल्या तुफानी कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे. त्याने 3 सामन्यांत तब्बल 71 च्या सरासरीनं 213 धावा केल्या आणि मोठी झेप घेतली.

त्यामुळे जादरान आता वनडे रँकिंगमध्ये जगातील क्रमांक 2 चा फलंदाज बनला आहे. त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकलं आहे.

सध्या शुबमन गिल (Shubman gill) 784 रेटिंग पॉइंटसह क्रमांक 1 वर आहे. मात्र गिल आणि जादरान यांच्यातील अंतर केवळ 20 पॉइंट्स इतकंच उरलं आहे. याशिवाय बाबर आझम (Babar Azam) आणि शाई होपलाही (Shai Hope) या ताज्या रँकिंगमध्ये फटका बसला आहे.

Comments are closed.