हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर धक्कादायक.. भिवंडीचा राजवीर तरे निघाला मिझानूर, नेरळ पोलीस ठाण्यात विवाहितेची तक्रार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भिवंडीत राहणारा राजवीर तरे हा मिझानूर रहमान असल्याचा पर्दाफाश झाला आहे. मिझानूरने राजवीर तरे नावाने इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट टाकून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिचे बळजबरीने धर्मांतरही केले. मिझानूर अनेक तरुणींना अशीच फ्रेंड रिक्वेस्ट टाकून त्यांना जाळ्यात अडकवत असल्याचे कळताच या तरुणीने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र त्यानंतर मिझानूर माझ्या मुलाला घेऊन बेपत्ता झाला असल्याचा आरोपही या तरुणीने केला आहे.

फसवणूक झालेल्या पीडितेने दिलेल्या तक्रारीत मिझानूर रहमान याच्या काळ्या कृत्याचा पाढा वाचला आहे. या तरुणीला भिवंडीच्या राजवीर तरे नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारल्यानंतर राजवीर तरे याने त्या तरुणीसोबत प्रेमाचे नाटक केले. नंतर त्याने त्या तरुणीला लग्नाची मागणीही घातली.

लग्नाची बोलणी सुरू असतानाच त्याचे नाव राजवीर नसून तो मिझानूर रहमान असल्याचे कळताच तिला धक्का बसला आणि तिने लग्नाला नकार दिला. मी कोणताही धर्म पाळत नाही असे सांगत त्याने त्याची समजूत काढली आणि तिला तुझ्या धर्माप्रमाणेच राहा असे मिझानूरने सांगितल्याचे या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव वाढला. मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला आणि अखेर तिचे धर्मांतर करण्यात येऊन तिचे नाव झोया मिझानूर रहमान असे ठेवण्यात आले. त्यानंतर या दांपत्याला मुलगाही झाला.

चार हिंदू मुलींच्या संपर्कात; प्रेमाचे नाटक

झोया मिझानूरने पती मिझानूर रहमानचा मोबाईल पाहिला असता तो आणखी चार हिंदू मुलींच्या संपर्कात असल्याचे पाहून तिला धक्काच बसला. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरू केली. या घटनेनंतर मिझानूर हा माझ्या मुलाला घेऊन घरातून निघून गेल्याची तक्रार या पीडित तरुणीने नेरळ पोलीस ठाण्यात केली आहे.

Comments are closed.