Woman killed after being run over by tractor while riding bike with headphones on
कानात हेडफोन लावून दुचाकीवरून जात असताना तोल गेल्याने टॅक्टरच्या ट्रॉलीखाली आल्याने महिला ठार झाल्याची धक्कादायक घटना अशोकस्तंभ परिसरातील वास्तल्य आधाराश्रमासमोर सोमवारी (दि.३) सकाळी ११.३० वाजता घडली. अपघातानंतर टॅक्टर चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अलका देवराज गुज्जर (वय ३१, रा. बच्छावबाबा चाळ, बोरगड, म्हसरूळ, नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. (Woman killed after being run over by tractor while riding bike with headphones on)
पोलिसांच्या माहितीनुसार, अलका गुज्जर सोमवारी (दि.३) सकाळी ११.३० वाजेदरम्यान अशोकस्तंभकडून घारपुरे पुलाकडे दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी त्यांनी कानाला हेडफोन लावले होते. दुचाकी शेजारून ट्रक जात असताना त्यांचा तोल गेला. त्यात दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूल पडली तर त्या रस्त्यावर पडल्या. तितक्यात टॅक्टरच्या ट्रॉलीखाली आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ही बाब परिसरातील नागरिकांना समजताचा गुज्जर यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नरोटे यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस अंमलदार बागूल करत आहेत.
माझ्या आईला बोलावा ना
अलका गुज्जर यांचा अपघात झाल्याचे समजताच नातलग जिल्हा रुग्णालयात आले. यावेळी गुज्जर यांच्या बहीण आणि मुलाने हंबरडा फोडला. मुलाला रडताना पाहून उपस्थित रुग्णांच्या नातलगांचेही डोळे पाणावले. गुज्जर यांचा मुलगा मृतदेहाकडे पाहून सारखा माझ्या आईला बोलावा ना म्हणत होता. हे दृश्य पाहून गुज्जर यांच्या नातलगांना आश्रू अनावर झाले होते. नातलग गुज्जर यांच्या मुलास जवळ घेत देत देण्याचा प्रयत्न करत होते.
Comments are closed.