प्रियकरासाठी पत्नी हैवान बनली, पतीला दारु पाजली, कानात विष टाकून जीव घेतला!
तेलंगणा: तेलंगणातील करीमनगरमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली. पोलिसांनी काल (बुधवारी, ता 6) सांगितले की, करीमनगर शहरातील किसन नगरमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकर आणि दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने तिच्या पतीच्या कानात हर्बिसाइड (तणनाशक) ओतून त्याची हत्या केली.
38 वर्षीय महिलेचे 50 वर्षीय व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध
पोलिसांनी सांगितले की, 29 जुलै रोजी घडलेली ही घटना बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीच्या पोलिस तपासादरम्यान उघडकीस आली. आता तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. करीमनगर पोलिस आयुक्त गौशा आलम यांनी सांगितले की, 38 वर्षीय महिलेचे 50 वर्षीय कर्रे राजैया यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. महिलेचा पती संपत याला दारूचे व्यसन असल्याचे वृत्त आहे. मृत संपत (45) करीमनगरमधील किसननगर येथील रहिवासी होता. ते जिल्हा ग्रंथालयात सफाई कामगार म्हणून काम करायचा. तो त्याची पत्नी रमादेवी आणि त्याच्या मुलासोबत राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, संपतला दारूचे व्यसन लागले होते आणि तो त्याच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचा आणि त्याच्या पत्नीचा शारीरिक छळ करायचा.
महिलेने सुरुवातीला तिचा पती बेपत्ता असल्याचा दावा केला
आयुक्तांनी सांगितले की, महिलेने राजैया आणि त्याचा साथीदार केसरी श्रीनिवास यांच्यासोबत मिळून तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचला होता. आखलेल्या योजनेनुसार, तिघेही संपतला एकत्र येण्याच्या बहाण्याने शहराच्या बाहेरील भागात घेऊन गेले. तिथे त्याला दारू पाजल्यानंतर, तो बेशुद्ध असताना त्यांनी त्याच्या कानात तणनाशक ओतले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला,’ असे पोलिसांनी सांगितले. शंका दूर करण्यासाठी, महिलेने सुरुवातीला तिचा पती बेपत्ता असल्याचा दावा करत पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, चौकशीदरम्यान तिच्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी सांगितले की त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. गौशा आलम यांनी सांगितले की ही हत्या पूर्वनियोजित ठरावीक हेतूने रचलेली होती.
विषारी औषध संपतच्या कानात ओतले
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी, मद्यपी पतीच्या अत्याचाराला कंटाळलेल्या रमादेवीचे किसननगर येथील रहिवासी असलेल्या कर्रे राजैया याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्यांनी संपतला संपवण्याचा कट रचला. करीमनगरमध्ये रेल्वे पोर्टर म्हणून काम करणाऱ्या राजैया यानी 29 जुलै रोजी बोम्मक्कल रेल्वे ट्रॅकजवळ संपतला त्याच्यासोबत दारू पिण्यासाठी बोलावले. संपत दारूच्या नशेत असताना, राजैया यानी रमादेवीला फोन करून माहिती दिली. हर्बिसाइड (तणनाशक) म्हणून ओळखले जाणारे विषारी औषध संपतच्या कानात ओतले. हे रसायन संपतच्या मेंदूत पोहोचले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
जेव्हा संपत घरी परतला नाही, तेव्हा रमादेवी तिच्या मुलाला आणि राजैयासोबत त्याला शोधण्याचे नाटक करत होती. 2 ऑगस्ट रोजी त्यांना रुळाजवळ मृतदेह सापडला आणि पोलिसांना कळवले. संपतच्या मुलाला त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल संशय असल्याने त्याने औपचारिक तक्रार दाखल केली. रमादेवीच्या मोबाईल फोनची तपासणी केल्यावर, अधिकाऱ्यांना राजैया यांच्याशी झालेल्या तिच्या संवादाचे पुरावे सापडले. चौकशीदरम्यान, रमादेवीने राजैया आणि गुन्ह्यात मदत करणारा त्याचा मित्र केसरी श्रीनिवास यांच्यासह तिचा गुन्हा कबूल केला. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि ते आता पोलिस कोठडीत आहेत. घटनेचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.