विश्वचषकात भारताची विजयी सुरुवात; दीप्ती शर्माने पूर्ण सामना फिरवला, श्रीलंकेविरुद्ध दणदणीत यश
महिला एकदिवसीय विश्वचषक 2025: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या (Women’s ODI World Cup 2025) सामान्याची सुरुवातच भारतीय संघाने दणदणीत विजयाने केली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यात स्मृती मानधना (Smriti Mandhana) अवघ्या आठ धावा करत स्वस्तात बाद झाली. मात्र त्यानंतर प्रतिका रावलने (Pratika Rawal) हरलीन देओलसोबत (Harleen Deol) मिळून 67 धावांची भागीदारी केली. मधल्या फळीत विकेट पडल्यानंतर भारतावर दबाव आला, परंतु दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि अमनजोत कौर (Amanjot Kaur) यांनी अर्धशतके झळकावून संघाला 268 धावांपर्यंत पोहोचवले. तर पुढे लक्ष्याचा पाठलाग करताना, श्रीलंकेचा संघ 211 धावांवर सर्वबाद झाला. यात दीप्तीने फलंदाजी आणि चेंडू दोन्हीने उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघाला विजयासाठी मोलाची कामगिरी बजावली?
दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने झळकावले अर्धशतक (Deepti Sharma and Amanjot Kaur scored half-centuries)
दरम्यानभारताची तिसरी विकेट हरलीन देओलच्या (Harleen Deol) रूपात पडली, जी तिच्या अर्धशतकापासून अवघ्या दोन धावांनी कमी पडली. 120/2 पासून, टीम इंडियाची धावसंख्या 124/6 झाली असता पुन्हा चार धावांच्या आत चार विकेट गमावल्या. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी अर्धशतके झळकावून संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली. दीप्ती शर्माने 53 चेंडूत 53 धावा, अमनजोत कौरने 56 चेंडूत एक षटकार आणि पाच चौकारांसह 57 धावा केल्या. स्नेह राणाने 15 बॉलमध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांसह 28 धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली.
📸 📸
बॉल रोलिंगमध्ये सेट करण्याचा एक क्रॅकिंग मार्ग #CWC25 साठी #Teamindia! 🙌 🙌
स्कोअरकार्ड ▶ ️ https://t.co/lcsnn79t77#वोमेनिनब्ल्यू | #Indvsl pic.twitter.com/kgoylhr67f
– बीसीसीआय महिला (@bcciwomen) 30 सप्टेंबर, 2025
डीआयपीटीई शर्मा हे महत्त्वपूर्ण खेळ आहेत, कठोर एक लक्षण
दरम्यान270 धावांचा पाठलाग करताना, श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने 30 धावांवर आपला पहिला बळी गमावला. तेव्हा क्रांती गौडने हसिनी परेरा (14) ला बाद केले. त्यानंतर कर्णधार चामारी अटापट्टूने हर्षिता माधवीसोबत 52 धावांची भागीदारी केली. ज्याप्रमाणे दीप्तीने फलंदाजीच्या कठीण परिस्थितीतून मात केली होती, त्याचप्रमाणे तिने चेंडूनेही तेच केले. दीप्तीने श्रीलंकेच्या कर्णधार अटापट्टूला बाद करत सामन्यातील महत्त्वाचा बळी घेतला. अटापट्टूने 47 चेंडूत 43 धावा केल्या, त्यात 3 षटकार आणि 4 चौकार मारले. त्यानंतर हर्षिता 29 धावांवर बाद झाली.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.