समोर बलाढ्य संघ, हरमनप्रीत कौरची टीम सेमी फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या वर्ल्डकपचं समीकरण


महिला विश्वचषक 2025 उपांत्य फेरीच्या पात्रता परिदृश्य संघ: महिला विश्वकप 2025 आता एका रोमांचक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. प्रत्येक सामन्यानंतर पॉईंट्स टेबलचं (Women’s World Cup 2025 Points Table) चित्र बदलताना दिसत आहे. 13 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात (South Africa Beat Bangladesh) झालेल्या लीग टप्प्यातील 14व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात 3 गडी राखून विजय मिळवला. लौरा वुल्फार्टच्या नेतृत्वाखालील या विजयानं आफ्रिकन संघाला तर उभारी मिळालीच, पण याचसोबत यजमान भारताला मोठा धक्का बसला आहे. या निकालामुळे टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये एक स्थान खाली घसरली आहे.

दक्षिण आफ्रिकेनं घेतली भारताची जागा

बांगलादेशवर मात करत दक्षिण आफ्रिका आता पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. सामन्यापूर्वी हे स्थान भारताकडे होतं. आफ्रिकेने आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले आहेत, तर भारताने 4 पैकी फक्त 2 सामने जिंकले असून त्यांचे 4 गुण आहेत. त्यामुळे भारत आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया 4 पैकी 3 सामने जिंकून  7 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्याचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर इंग्लंड 3 पैकी 3 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे.

टीम इंडियासाठी ‘करो या मरो’, पण समोर बलाढ्य संघ (Team India Semi-final Qualification Scenario)

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताचा टॉप-4 मध्ये राहणं अत्यावश्यक आहे. पण आता हे काम सोपं राहिलेलं नाही. पुढील तीन सामने न्यूझीलंड, बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. 8 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला यापैकी किमान 2 सामने जिंकावेच लागतील. जर फक्त 6 गुणांसह पात्र ठरायचं असेल, तर भारताला प्रार्थना करावी लागेल की न्यूझीलंड आपल्या 4 पैकी किमान 2 सामने गमावेल.

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 3 विकेट्सने केला पराभव

बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शर्मिन अक्तर (50) आणि शोर्ना अक्तर (51*) यांनी त्यांना 233 धावांचे लक्ष्य दिले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली, त्यांनी 78 धावांवर अर्धा संघ गमावला. मॅरिझाने कॅप आणि क्लो ट्रायॉन यांनी अनुक्रमे 56 आणि 62 धावा करून दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला, शेवटच्या षटकात तीन विकेट्स हातात असताना सामना जिंकला.

हे ही वाचा –

Virat Kohli IPL 2026 : विराट कोहलीचा RCBला रामराम? नव्या कॉन्ट्रॅक्टवर साइन करण्यास दिला नकार; IPLपूर्वीच घेतला धक्कादायक निर्णय, जाणून घ्या Inside Story…

आणखी वाचा

Comments are closed.