टीम इंडियाकडून पराभूत झाल्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका! ग्रुप ‘ए’ च्या पॉइंट्स टेबलमध्ये एका ‘अनपेक्षित’ संघाचे वर्चस्व

15 फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘वुमेन्स आशिया कप राइजिंग स्टार’ सामन्यात इंडिया ‘ए’ संघाने पाकिस्तान ‘ए’ चा 8 विकेट्सनी पराभव केला आहे. या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघाला मोठा फायदा झाला असून पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानसह युएई (UAE) आणि नेपाळचा संघ एकाच ग्रुपमध्ये आहे.
या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमधील स्थिती बदलली आहे. या विजयानंतर भारतीय संघ 2 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा नेट रन रेट +1.830 इतका जबरदस्त आहे. तर पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचेही 2 गुण आहेत,(-1.012) असल्याने ते भारताच्या मागे आहेत. युएईचा संघ या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आहे. 2 सामन्यांत 2 विजय मिळवून ते 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. दोन्ही सामने हरल्यामुळे नेपाळचा संघ सर्वात शेवटच्या (चौथ्या) स्थानी आहे.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 18.5 षटकांमध्ये सर्वबाद 93 धावा केल्या होत्या. 94 धावांचे हे लक्ष्य इंडिया ‘ए’ संघाने केवळ 10.2 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केले. भारताच्या वृंदा दिनेशने अवघ्या 29 चेंडूत 55 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत तिने 12 चौकार मारले. तिला अनुष्का शर्मा (24 धावा) आणि तेजल (नाबाद 12 धावा) यांनी मोलाची साथ दिली.
Comments are closed.