रॅपर बादशाहला महिला आयोगाचा दणका, नोटीस देऊनही गैरहजर राहिल्याने दिले अटकेचे निर्देश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रॅपर आणि गायक बादशाहने त्याच्या नवीन हरयाणवी गाण्याच्या ‘टिटरी’ गाण्याच्या बोल आणि दृश्यांशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा महिला आयोगाने गायक-रॅपर बादशाहविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. नोटीस देऊनही शुक्रवारी आयोगासमोर हजर न राहिल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी त्याच्या अटकेचे निर्देश जारी केले.त्याचबरोबर पंचकुला आणि पानिपतच्या अधीक्षकांना बादशाहचा पासपोर्ट जप्त करण्याचे निर्देश दिले.

गाण्यावरील आक्षेपांमुळे आयोगाने 6 मार्च रोजी नोटीस बजावली होती आणि बादशाहला 13 मार्च रोजी पानिपत एसपीच्या कार्यालयात आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले होते. तथापि, बादशाहच्या वतीने वकिलांचा एक गट उपस्थित राहिला. बादशाहचे प्रतिनिधित्व करणारे वकील अक्षय दहिया यांनी सांगितले की, बादशाह त्याच्या व्यग्र वेळापत्रकामुळे उपस्थित राहू शकला नाही. त्याने आयोगाकडे नंतरच्या तारखेला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याची बाजू मांडण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, रेणू भाटिया यांनी रॅपरच्या अटकेचे आदेश जारी केले आणि सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.

यासह संपूर्ण राज्याला सूचना जारी केले की, जोपर्यंत बादशाह आयोगासमोर हजर होत नाही, तोपर्यंत बादशाहच्या कोणत्याही संगीत कार्यक्रमांना हरयाणात परवानगी दिली जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं की, पोलीस तपासादरम्यान बादशाह परदेशात जाऊन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशावेळी पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त करावा. तसेच या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Comments are closed.