Women's World Cup 2025: बांग्लादेशने पाकिस्तानला हरवले, पॉइंट्स टेबलमध्ये भारताची घसरण
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा तिसरा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश संघांमध्ये कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. चाहत्यांना रोमांचक सामन्याची अपेक्षा होती, परंतु पाकिस्तानी महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये निराशाजनक कामगिरी केली आणि सात विकेट्सने एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पाकिस्ताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांना 129 धावांवर गारद करण्यात आले. बांगलादेश महिला संघाने 31.1 षटकांत तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि गुणतालिकेत आपले खाते उघडले.
आतापर्यंत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात सहा संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. गुणतालिकेत गतविजेता ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे, तर बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारतीय महिला संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. सध्या तिन्ही संघांचे प्रत्येकी 2 गुण आहेत, परंतु येथे नेट रन रेट महत्त्वाची भूमिका बजावतो. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट 1.780 , बांगलादेशचा 1.623 आणि भारतीय महिला संघाचा नेट रन रेट 1.255 आहे. जशी स्पर्धा पुढे जाईल, पहिल्या चार संघांमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सर्व संघांसाठी नेट रन रेट महत्त्वाचा असेल.
महिला एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने अद्याप एकही सामना खेळलेला नाही, तर न्यूझीलंड पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे, त्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला. पाकिस्तान महिला संघ 7 व्या क्रमांकावर आहे. स्पर्धेत त्यांचा पुढचा मार्ग आणखी आव्हानात्मक असण्याची अपेक्षा आहे, तर श्रीलंका सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान5 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाविरुद्ध त्यांचा दुसरा सामना खेळेल, जो कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.
Comments are closed.