Women's World Cup 2025: स्पर्धा सुरू होण्याआधीच वेळापत्रकात बदल, घेतला मोठा निर्णय

महिला विश्वचषक 2025: महिला विश्वचषक 2025 भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. पण आता त्याआधीच त्याच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. बेंगळुरूमधील चेंगराचेंगरीनंतर आता आयसीसीने बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणारे सामने नवी मुंबईतील मैदानावर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आता येथे एकूण चार सामने खेळवले जातील.

चेंगराचेंगरीमुळे बेंगळुरूमध्ये सामने रद्द

आयपीएल 2025चे विजेतेपद आरसीबी संघाने जिंकले. यानंतर, आरसीबीचे खेळाडू बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय साजरा करण्यासाठी जमले. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती आणि त्यानंतर चेंगराचेंगरीमुळे अनेक चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर कर्नाटक सरकारने एक आयोग स्थापन केला, ज्याने बेंगळुरूचे मैदान मोठ्या स्पर्धांसाठी असुरक्षित घोषित केले. आता यानंतरच आयसीसीने बेंगळुरूच्या मैदानावर सामने न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईच्या मैदानावर सामने होतील

महिला विश्वचषक 2025चे एकूण 4 सामने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर होणार होते. यामध्ये तीन लीग सामने आणि एक उपांत्य फेरीचा समावेश होता. यामध्ये 30 सप्टेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध श्रीलंका सामना, 3 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना, 26 सप्टेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना आणि 30 ऑक्टोबर रोजी होणारा उपांत्य फेरीचा सामना यांचा समावेश होता. अंतिम सामना नवी मुंबई आणि नंतर कोलंबोमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

Comments are closed.