Women's World Cup Point Table: भारताला बसला 440 व्होल्टचा झटका, दक्षिण आफ्रिकेची टॉप-4 मध्ये एंट्री
दक्षिण आफ्रिकेने नॅडिन डी क्लर्कच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारतावर 3 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर झेप घेतली. हा सामना 9 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आला. टॉस गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने 50 षटकांत 252 धावा केल्या. एकवेळ 6 बाद 102 अशी अवस्था असताना रिचा घोषने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 94 धावांची जबरदस्त खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. भारताच्या टॉप ऑर्डरने पुन्हा एकदा निराशा केली.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात देखील खराबच झाली होती. 81 धावांवर त्यांच्या पाच फलंदाज माघार परतले होते आणि 142 धावांवर सहावा गडी बाद झाला. मात्र त्यानंतर मैदानात उतरलेल्या नॅडिन डी क्लर्कने 54 चेंडूत 84 धावांची वादळी खेळी साकारली. क्लो ट्रायोनने देखील 49 धावांची मोलाची साथ दिली. दोघींनी मिळून सामन्याचं पारडं पूर्णतः दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकवलं आणि 7 चेंडू राखून सामना जिंकला.
या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 3 पैकी 2 विजय नोंदवले गेले असून 4 गुणांसह त्यांनी टॉप-4 मध्ये स्थान मिळवलं आहे. मात्र त्यांचा नेट रन रेट -0.888 असा नकारात्मक आहे, जो त्यांच्या वाटचालीस अडथळा ठरू शकतो. भारताला स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला असून त्यामुळे ते अव्वल स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. आता भारताला उर्वरित सामने जिंकून पुन्हा टॉप-2 मध्ये परतण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
आयसीसी महिला विश्वचषक 2025 पॉइंट्स टेबल (10 ऑक्टोबर 2025)
क्रमांक | युनियन | समोर | विजय | पराभव | टाय | निकाल नाही | मालमत्ता | निव्वळ रन रेट |
---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | ऑस्ट्रेलिया | 3 | 2 | 0 | 0 | 1 | 5 | +1.960 |
2 | इंग्लंड | 2 | 2 | 0 | 0 | 0 | 4 | +1.757 |
3 | भारत | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | +0.953 |
4 | दक्षिण आफ्रिका | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | -0.888 |
5 | बांगलादेश | 2 | 1 | 1 | 0 | 0 | 2 | +0.573 |
6 | श्रीलंका | 2 | 0 | 1 | 0 | 1 | 1 | -1.255 |
7 | न्यूझीलंड | 2 | 0 | 2 | 0 | 0 | 0 | -1.485 |
8 | पाकिस्तान | 3 | 0 | 3 | 0 | 0 | 0 | -1.887 |
Comments are closed.