विश्वचषक पात्रता फेरीचे वेळापत्रक जाहीर; 'या' संघांमध्ये खेळवली जाईल स्पर्धा
2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आली, जी भारताने जिंकली. ही स्पर्धा पाकिस्तान क्रिकेटसाठी खूप महत्त्वाची होती कारण जवळजवळ 29 वर्षांनंतर देशाला आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानची कामगिरी खूपच खराब होती. त्यांचा संघ एकही सामना न जिंकता स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र, आता पाकिस्तानी चाहत्यांना आणखी एक आयसीसी स्पर्धा पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ खेळतील. याबाबत, आयसीसीने 14 मार्च रोजी वेळापत्रकही जाहीर केले आहे.
खरंतर, महिला एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताच्या यजमानपदाखाली खेळला जाईल. या स्पर्धेत एकूण 8 संघ खेळताना दिसतील. आतापर्यंत 6 संघ महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. तर, महिला एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीतून 2 संघ निश्चित केले जातील. हे सर्व पात्रता सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. महिला एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत एकूण 6 संघ खेळतील, ज्यात यजमान पाकिस्तान, स्कॉटलंड, आयर्लंड, श्रीलंका, थायलंड आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. दरम्यान , पाकिस्तानी चाहत्यांना आणखी एक आयसीसी स्पर्धेचा सामना पाहण्याची संधी मिळेल. या पात्रता फेरीचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी लाहोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यात खेळला जाईल, त्याच दिवशी स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात आणखी एक सामना खेळला जाईल. सहा संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत बांगलादेश आणि थायलंड हे संघ 10 मार्च रोजी एकमेकांसमोर येतील.
महिला एकदिवसीय विश्वचषक पात्रता वेळापत्रक
9 एप्रिल – पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड आणि स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडिज
10 एप्रिल – बांगलादेश विरुद्ध थायलंड
11 एप्रिल – पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड आणि आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज
13 एप्रिल – बांगलादेश विरुद्ध आयर्लंड आणि स्कॉटलंड विरुद्ध थायलंड
14 एप्रिल – पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज
15 एप्रिल – बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड आणि आयर्लंड विरुद्ध थायलंड
17 एप्रिल – पाकिस्तान विरुद्ध थायलंड आणि बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज
18 एप्रिल – आयर्लंड विरुद्ध स्कॉटलंड
19 एप्रिल – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आणि थायलंड विरुद्ध वेस्ट इंडिज
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानमध्ये होणारी ही दुसरी बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जातील कारण 24 एप्रिलपर्यंत तेथे पीएसएलचा कोणताही सामना होणार नाही. पीएसएल 2025 रावळपिंडी येथे 11 एप्रिल रोजी सुरू होईल. भारत पाचव्यांदा आणि 2011 नंतर पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. 2016 नंतर पहिल्यांदाच आयसीसी महिला स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे.
Comments are closed.