विमान-प्रक्षेपण 'प्रार्थना' क्षेपणास्त्रावर काम सुरू होते

7473 कि.मी. प्रतितासाच्या वेगाने शत्रूचा घेणार वेध : डीआरडीओकडून होणार विकास

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

डीआरडीओने प्रलय क्षेपणास्त्राच्या एअर लाँच्ड वर्जनवर काम सुरू केले आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या रणनीतिक हल्ल्याची क्षमता वाढविणारे ठरणार आहे. प्रलय एक क्वासी-बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून ते 6.1 मॅकच्या वेगाने झेपावते, म्हणजेच 7473 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने ते शत्रूवर प्रहार करणार आहे.

प्रलय एक शॉर्ट-रेंज सरफेस-टू-सरफेस क्षेपणास्त्र असून ते डीआरडीओने विकसित केले आहे. हे 150-500 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याला नष्ट करू शकते. हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र सध्या 5 टन वजनाचे असून ट्रकमधून प्रक्षेपित केले जाते. या क्षेपणास्त्रात अॅडव्हान्स गायडेन्स सिस्टीम असून ती याला अचूक लक्ष्यभेद करण्यास मदत करते.

एअर लाँच्ड वर्जन

प्रलय क्षेपणास्त्राच्या एअर लाँच्ड वर्जनमुळे भारतीय सैन्याच्या सामर्थ्यात भर पडणार आहे. विमानातून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्राला कुठेही वेगाने तैनात करता येणार आहे. शत्रूच्या भागात खोलवर लक्ष्यापर्यंत हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामुळे वाढणार आहे. तसेच विमानातून डागता येणाऱ्या या क्षेपणास्त्रामुळे शत्रूला बचावाची संधी मिळणार नाही. परंतु या क्षेपणास्त्रासाठीचे तंत्रज्ञान अत्यंत आव्हानात्मक आहे, कारण बॅलेस्टिक क्षेपणास्त्राला आकाशातून डागणे क्रूज क्षेपणास्त्राहून अधिक जटिल आहे.

तांत्रिक आव्हाने कोणती?

वजन कमी करणे : प्रलय क्षेपणास्त्राचे वजन 5 टन असून ते लढाऊ विमानासाठी अत्यंत भारी आहे, यामुळे या क्षेपणास्त्राचे वजन कमी करावे लागेल, सुमारे 2-3 टनापर्यंत. याकरता कमी वजनाची सामग्री म्हणजेच कार्बन फायबर किंवा टायटेनियमचा वापर करावा लागेल.

डिझाइनमध्ये बदल : क्षेपणास्त्राचे पंख आणि आकाराला पुन्हा डिझाइन करावे लागेल, जेणेकरून आकाशात वेगळे होणे आणि स्थिर राहण्यास मदत मिळेल.

सीओजी : क्षेपणास्त्राच्या वजन केंद्राला (सीओजी) संतुलित करावे लागेल, जेणेकरून विमानातून डागल्यावर ते सुरक्षित राहू शकेल.

प्रोप्लशन सिस्टीम : आकाशात सुरक्षित ज्वलनासाठी नवी प्रणाली तयार करावी लागेल, हे कार्य जोखिमयुक्त आहे.

स्थिरता आणि उ•ाण : ब्राह्मोस हे सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र असून ते हलके आणि स्थिर असते. परंतु प्रलय हायपरसोनिक आणि प्रति मीटर अवजड आहे. यामुळे ते आकाशातून डागणे आणि प्रोप्लशन सुरू करण्यास अडचणी येतील. आकाशात क्षेपणास्त्राचे संतुलन राखणे आणि योग्य दिशेने उ•ाण करणे आव्हानात्मक आहे. डीआरडीओ 2028-29 दरम्यान प्रलयच्या एअर लाँच्ड वर्जनचे उ•ाण परीक्षण करणार आहे.

भारतासाठी हे पाऊल खास

हायपरसोनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राला आकाशातून डागण्याच्या तंत्रज्ञानावर काही निवडक देशांनी (अमेरिका आणि रशिया) काम केले आहे. भारत या क्षेत्रात नवे पाऊल ठेवत आहे. हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूंच्या विरोधात भारताच्या सुरक्षेला मजबूत करणार आहे. या क्षेपणास्त्राला विकसित करण्यास यश मिळाले तर भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक शक्ती ठरू शकतो.

Comments are closed.