आंध्र प्रदेशातील महिलांसाठी होम सुविधा पासून काम
मुख्यमंत्री नायडू यांची योजना : प्रत्येक शहर, तालुक्यात आयटी ऑफिस
वृत्तसंस्था/ अमरावती
आठवड्यात कामाचे 90 तास असावे यावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आंध्रप्रदेश सरकारने महिलांसाठी वर्क फ्रॉम होमचा नियम लागू करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी याची घोषणा केली आहे. परंतु ही योजना कशाप्रकारे लागू करण्यात येणार याचा तपशील उघड करण्यात आलेला नाही.
सध्या आम्ही महिलांच्या अनेक क्षेत्रांमधील कामगिरीचा आनंद व्यक्त करताहे. आमचे सरकार महिलांना अनेक क्षेत्रांमध्ये समान संधी सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. कोविड 19 महामारीनंतर काम करण्याच्या पद्धतींमध्ये मोठा बदल घडून आला आहे. तंत्रज्ञानामुळे वर्क फ्रॉम होम करणे सोपे ठरले आहे, असे उद्गार नायडू यांनी काढले आहेत.
रिमोट वर्क, कोवर्किंग स्पेस अणि नेबरहुड वर्कस्पेस यासारख्या व्यवस्था बिझनेस आणि काम करणाऱ्या लोकांसाठी अधिक उत्तम ठरल्या आहेत. तसेच यामुळे कामाची उत्पादकता देखील वाढणार असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे.
वर्क फ्रॉम होमच्या पुढाकारामुळे काम आणि आयुष्याला संतुलित राखण्यास मदत मिळणार आहे. हा पुढाकार अर्थपूर्ण व्हावा म्हणून राज्य सरकार योजनेवर काम करत आहे. आंध्रप्रदेश आयटी आणि जीसीसी धोरण 4.0 या दिशेने गेमचेजिंग पाऊल आहे. आमचे सरकार प्रत्येक शहर, तालुक्यात आयटी ऑफिस स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तसेच आयटी आणि जीसीसी कंपन्यांचे समर्थन देखील करत आहे, जेणेकरून रोजगार निर्माण व्हावेत. वर्क फ्रॉम होमचा पर्याय असल्याने वर्कफोर्सला चालना मिळेल, विशेषकरून याचा लाभ महिला तंत्रज्ञांना होईल असे नायडू यांनी नमूद केले आहे.
Comments are closed.