ब्रह्मोस-2 क्षेपणास्त्रावर लवकरच काम सुरू होणार आहे
4 मिनिटात पाकिस्तानातील कुठल्याही ठिकाणी हल्ला करण्याची क्षमता : 25 टक्के चीन मारक पल्ल्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि रशिया ब्राह्मोस-2 हायपरसोनिक क्षेपणास्त्राला मंजुरी देण्याच्या तयारीत आहेत. हे पुढील पिढीचे क्षेपणास्त्र असून ते रशियन प्रोपल्शन (इंजिन तंत्रज्ञान) आणि भारतीय सेंसर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर विरोधी एव्हियोनिक्सचे (उ•ाण नियंत्रण प्रणाली) मिश्रण आहे. या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 1500 किलोमीटर असणार आहे.
ब्राह्मोस-2 हे ब्राह्मोसचे अत्याधुनिक वर्जन असेल. ब्राह्मोस हा भारत-रशियाचा संयुक्त प्रकल्प आहे. ब्राह्मोस-1 सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे, परंतु ब्राह्मोस-2 हायपरसोनिक (ध्वनिपेक्षा 5 पट वेगवान) असेल. हायपरसोनिक क्षेपणास्त्राला शत्रूचे रडार किंवा क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा रोखू शकणार नाही. हे क्षेपणास्त्र शत्रूचे महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजेच वायुतळ, बंदर आणि कमांड सेंटरवर अचूक हल्ला करू शकते. रशियाचे इंजिन याला अनोखा वेग मिळवून देईल, तर भारताचे सेंसर लक्ष्याचा अचूकपणे शोधू शकतील. 2031 पर्यंत हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्यात सामील होणार आहे.
पूर्ण पाकिस्तान टप्प्यात
पाकिस्तानचे एकूण क्षेत्रफळ 7.96 लाख चौरस किलोमीटर आहे, पाकिस्तानची सर्वाधिक लांबी-रुंदीही 1500 किलोमीटरपेक्षा कमी आहे. राजस्थान किंवा गुजरातच्या लाँच साइटवरून डागण्यात आल्यास हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या कराची, इस्लामाबाद, रावळपिंडी (आण्विक ठिकाण) या शहरांना सहजपणे लक्ष्य करू शकते. अमृतसर येथून इस्लामाबादसाठीचे अंतर केवळ 500 किलोमीटर आहे. क्षेपणास्त्र हे अंतर केवळ 4-5 मिनिटात कापू शकते.
धोरणात्मक महत्त्व
पूर्वीचे ब्राह्मोस (800 किलोमीटर) पूर्ण पाकिस्तानला लक्ष्य करू शकते, परंतु 1500 किमीच्या कक्षेमुळे अफगाणिस्तान सीमेपर्यंत कारवाईची कक्षा वाढेल. चीनचा पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम हिस्सा क्षेपणास्त्राच्या मारक पल्ल्यात असेल. तिबेट, शिनजियांग, युनान, सिचुआन, चुनिंग या प्रांतांना हे क्षेपणास्त्र लक्ष्य करू शकणार आहे.
अरुणाचल किंवा आसाममधून ल्हासा (तिबेट) केवळ 500 किमी-3 मिनिटांत
चेंगडू (सिचुआन)-1000 किमी, कुनमिंग (युनान)-800 किमी
शिनजियांगचे उरुमकी-1200 किलोमीटर अंतरावर(लडाखपासून)
बीजिंग (2200-2500 किमी अंतरावर) कव्हर होणार नाही. मध्य चीनच्या शेन्जेनसारखे शहर आंशिक स्वरुपात मारक पल्ल्यात
ब्राह्मोस-2ची वैशिष्ट्यो…
क्षेपणास्त्राचा वेग : जवळपास 8500-10,000 किलोमीटर प्रतितास, प्रवासी विमानापेक्षा 10 पट वेगवान
मारक पल्ला : 1500 किलोमीटर, दिल्ली ते इस्लामाबाद केवळ 5-7 मिनिटांत
इंजिन : स्क्रॅमजेट (रशियन तंत्रज्ञान)- हवेतून ऑक्सिजन मिळवत प्रज्वलित होत असल्याने इंधन वाचविण्यास सक्षम.
लांबी/वजन : जवळपास 8-9 मीटर लांब, 2-3 टन वजन (ब्राह्मोस-एक सारखेच)
वॉरहेड : 200-300 किलोग्रॅम विस्फोटके- अचूक हल्ल्यासाठी वापरता येणार
लाँच प्लॅटफॉर्म : जमीन (मोबाइल लाँचर), समुद्र (युद्धनौका), पाणबुडी (अंडरवॉटर), आकाश (लढाऊ विमान)
उंची : 15-20 किलोमीटरची उंची गाठणार, मग कमी उंचीवर डाइव
रेंज अन् कव्हरेज : ब्राह्मोस-2 ची 1500 किमी रेंज भारतासाठी गेमचेंजर आहे, भारताच्या लाँच साइट्स (राजस्थान, आसाम, अंदमान बेट) मधून हे शेजारी देशांच्या मोठ्या हिस्स्याला लक्ष्य करू शकते.
Comments are closed.