विश्वचषक 2027 वेन्यूबाबत मोठी अपडेट समोर, या देशात होणार 44 सामने!
मागच्या वेळेस वनडे विश्वचषक 2023 चे यजमानपद भारताने सांभाळले होते. त्या विश्वचषकात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. पण दुर्दैवाने टीम इंडिया (Team india) किताब जिंकू शकली नव्हती. आता सर्वांच्या नजरा विश्वचषक 2027 (world cup 2025) लागल्या आहेत. आगामी वनडे विश्वचषक 2027 ची जबाबदारी तीन देश उचलणार आहेत. या मेगा इव्हेंटच्या वेन्यूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आगामी वनडे विश्वचषकाचं यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांकडे जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेला तब्बल 44 सामन्यांचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे, तर झिम्बाब्वे आणि नामिबिया या दोन देशांत मिळून 10 सामने खेळवले जातील. दक्षिण आफ्रिकेतील 44 सामने 8 वेगवेगळ्या मैदानांवर रंगणार आहेत. त्यात जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, केप टाउन, डरबन, गकेबरहा, ब्लोमफोन्टेन, ईस्ट लंडन आणि पार्ल या शहरांचा समावेश आहे.
दरम्यान, सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (virat kohli) भारतासाठी वनडे स्वरूपात खेळत आहेत. मात्र, 2027 च्या विश्वचषकाला अजून बराच वेळ आहे. त्यामुळे तोपर्यंत हे दोन्ही खेळाडू वनडे क्रिकेटमध्ये कायम राहतील की नाही, हे पुढील काळच ठरवेल. अशीही चर्चा आहे की, विश्वचषक 2027 च्या आधीच हे दोन्ही दिग्गज खेळाडू निवृत्तीची घोषणा करतील.
Comments are closed.