ओएलएकडून विश्वचषक विजयाचे सेलिब्रेशन; S1 Pro+ आणि Roadster X+ च्या चॅम्पियन्स एडिशन लाँच

ओला इलेक्ट्रिक चॅम्पियन्स संस्करण : आपला देश भारत हा क्रिकेटप्रेमी देश आहे. क्रिकेटच्या प्रेमासाठी कोण काय करेल याला मर्यादा नाही. नुकताच भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्याने देशभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये जल्लोष आणि आनंदाचे वातावरण आहे. या सर्व घडामोडींमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्र मागे कसे राहणार? प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी Ola ने भारताचा T20 विश्वचषक विजय साजरा करण्यासाठी Ola S1 Pro+ स्कूटर आणि रोडस्टर X+ मोटरसायकलची चॅम्पियन्स एडिशन लॉन्च केली आहे.
Ola ची S1 Pro+ Champions Edition कंपनीच्या टॉप-स्पेक स्कूटर (Ola Electric Champions Edition) वर आधारित आहे. या स्कूटरमध्ये 5.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. आणि यात 13 kW ची मोटर आहे. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 320 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
एवढेच नाही तर ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 2.1 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते असा दावा कंपनीने केला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,54,999 रुपये आहे. तथापि, शहरानुसार त्याची किंमत थोडीशी बदलू शकते.
दुसरीकडे, रोडस्टर X+ चॅम्पियन्स एडिशनला मोठा 9.1kW बॅटरी पॅक मिळतो. तसेच या बाईकमध्ये 11 kW ची मोटर बसवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक बाईक एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 501 किलोमीटरचे अंतर आरामात कापू शकते. मग काय तर मुंबई ते पुण्याचा परतीचा प्रवासही एका चार्जमध्ये करता येईल. ओला इलेक्ट्रिक चॅम्पियन्स संस्करण
या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 125 किमी प्रतितास आहे. त्यामुळे तुम्ही खूप जलद प्रवास करू शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही इलेक्ट्रिक बाईक फक्त २.७ सेकंदात ० ते ४० किमी/ताशी वेग पकडू शकते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1,09,999 रुपये आहे.
Comments are closed.