सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार?
नवी दिल्ली: 2025 हे वर्ष सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना दमदार रिटर्न देणारं ठरलंय. कारण, या वर्षी सोन्याचे दर 53 टक्क्यांनी वाढलेत. म्हणजेच ज्यांनी डिसेंबर 2024 मध्ये सोन्यात गुंतवणूक केली असेल त्यांना जोरदार फायदा झाला आहे. आगामी 2026 या वर्षात सोनं आणखी महाग होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोन्याचे दर सध्याच्या स्तरावरुन 15 ते 30 टक्क्यांनी वाढतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलनं हा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 127000 ते 130000 रुपयांच्या दरम्यान आहे. यात 30 टक्क्यांची वाढ म्हणजे. साधारणपणे 35 हजार ते 40 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.
Gold Rate Hike : सोने आणखी महागणार
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका नोटमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2025 मध्ये सोन्याचे दर 53 टक्क्यांनी वाढले आहेत. अमरिकेचं टॅरिफ आणि भूराजनैतिक अस्थिरतेच्या कारणामुळं गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्यानं त्यांनी सोन्यात गुंतवणूक केली. 2025 मध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार डायवर्सिफिकेशन आणि स्थिरता लक्षात गेता केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली.
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार कोसळत असलेले यील्ड, वाढता राजनैतिक तणाव यामुळं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढली. या परिस्थितीत सोन्याचे दर 2026 मध्ये 15 ते 30 टक्क्यांनी वाढू शकतात.
2025 मध्ये ग्लोबल गोल्ड ईटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंडस्मध्ये 77 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक गुंतवणूक झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या डेटानुसार त्यांच्या होल्डिंगमध्ये 700 टनाहून अधिक सोनं जमा झालंय. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अंदाजे 2026 मध्ये जर सोन्याचे दर घसरले तर 5 ते 20 टक्क्यांची घसरण होऊ शकते.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून दिवसातून दोनदा सोन्याचे दर जाहीर केले जातात. त्यांच्या वेबसईटनुसार 4 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 127850 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 124780 रुपये आहे. तर, एक तोळे 20 कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी 113780 रुपये मोजावे लागतील.
2025 मध्ये सोन्याच्या गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न मिळाले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 75000 रुपयांच्या दरम्यान होता. 4 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 127850 रुपये तोळा झाला आहे. म्हणजेच जवळपास 52000 रुपयांची वाढ झालीय. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. चांदीचे दर 86000 रुपये किलो होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा दर 184727 रुपयांवर पोहोचला.
4 डिसेंबरचे सोन्याचे 10 ग्रॅमचे दर
24 कॅरेट सोने : 127850 रुपये
22 कॅरेट सोने : 124780 रुपये
20 कॅरेट सोने : 113780 रुपये
18 कॅरेट सोने : 103550 रुपये
14 कॅरेट सोने : 82460 रुपये
आणखी वाचा
Comments are closed.