विश्वविक्रमी जोकोविच सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम सामने खेळणारा टेनिसपटू

सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविचने आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीतील सामन्यासाठी कोर्टवर पाऊल ठेवताच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळण्याचा नवा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला.

जोकोविच हा चारही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक 430 सामने खेळला असून हा नवा विक्रम आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत रॉजर फेडररची (429) बरोबरी केली होती. जोकोविचने दुसऱया फेरीत पात्रता फेरीतून आलेल्या पोर्तुगालच्या जेमी फरियाला 6-1, 6-7 (4), 6-3, 6-2 असे पराभूत केले. पुरुष गटात तृतीय मानांकित कार्लोस अल्काराझने शानदार कामगिरी कायम ठेवताना योशिहितो निशिओकाला 6-0, 6-1, 6-4 असा धक्का दिला.

Comments are closed.