सुप्रिसुद्ध फुटबॉलपटू मेस्सी मुंबईत, गणपती आरतीने चाहत्यांनी केले स्वागत

मुंबईत अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी यांच्या वानखेडे भेटीपूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मुंबईतील काही चाहते मेस्सीच्या पोस्टरसमोर गणपती आरती गाताना दिसत आहेत. कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपती आरती करण्याची परंपरा असल्याने, चाहत्यांनी मेस्सीच्या भेटीचे स्वागत या अनोख्या पद्धतीने केले.

इतकेच नाही तर एफसी बार्सिलोनाचे अनेक चाहते नरिमन पॉईंट येथे एकत्र जमले आणि तिथून वानखेडे स्टेडियमकडे कूच केला. यावेळी त्यांनी मेस्सीच्या नावाच्या घोषणा देत रॅली काढली.

या रॅलीदरम्यान अनेक चाहते एफसी बार्सिलोना आणि अर्जेंटिना संघांच्या जर्सी परिधान करून, हातात झेंडे घेत “मेस्सी, मेस्सी”च्या घोषणा देताना दिसले. आपल्या आवडत्या फुटबॉलपटूला पाहण्यासाठी आणि त्याच्या भेटीचा क्षण साजरा करण्यासाठी मुंबईतील चाहत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Comments are closed.