हिंदुस्थानची एकही संस्था टॉप 200 मध्ये नाही; वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 जाहीर… अमेरिकेची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सलग 10 वर्षे पहिल्या स्थानावर

टाईम्स हायर एज्युकेशनने वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 जाहीर केली आहे. या वर्षीही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी 98.2 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड सलग 10 वर्षे अव्वल स्थानावर आहे. या वर्षीही हिंदुस्थानातील एकही उच्च शिक्षण संस्था या यादीत टॉपमध्ये नाही. अगदी  टॉप 100 मध्येसुद्धा नाही. बंगळुरूची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ही संस्था 201 ते 250 पर्यंतच्या रँकिंगमध्ये आहे.

टाईम्स हायर एज्युकेशनतर्फे जगभरातील उच्च शिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानांकन केले जाते. त्यात प्रामुख्याने अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार, आंतरराष्ट्रीय भान असे निकष लावले जातात. त्यानुसार  पहिल्या 1000 विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. नव्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मधून उच्चशिक्षण क्षेत्रांतील आव्हाने समोर आली आहेत. यादीनुसार अमेरिकेच्या अनेक उच्च शैक्षणिक संस्थांचे रँकिंग घसरले आहे. 10 वर्षांत पहिल्यांदा आशियातील प्रमुख विद्यापीठे या यादीतील टॉप स्थानावरून गायब आहेत. चीनचे सिंघुया विद्यापीठ, पेकिंग विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरसारख्या संस्थांचे रँकिंग सुधारलेले नाही.

n आशियातील अनेक संस्था टॉप रँकिंगमधून गायब झाल्या आहेत. चीनच्या 21 टक्के विद्यापीठांनी आपले रँकिंग सुधारलेले आहे. दक्षिण कोरियातील संस्थांनी आपली रिसर्च क्वालिटी सुधारलेली आहे. दक्षिण कोरियाच्या चार संस्था टॉप 100 मध्ये आहेत. टोकियो युनिव्हर्सिटी 26 व्या स्थानावर आहे. हाँगकाँगमधील सहा विद्यापीठे टॉप 200 मध्ये आहेत. इंडोनेशियाच्या 35 संस्थांची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली आहे.

n वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 च्या टॉप 10 मध्ये अमेरिकेचा दबदबा दिसून येतोय. अमेरिकेतील सात संस्था पहिल्या दहामध्ये आहेत. ऑक्सफर्डनंतर मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रिस्टन युनिव्हर्सिटी तिसऱ्या स्थानावर आहे.

हिंदुस्थानातील शिक्षण संस्थांचे रँकिंग

संस्थेचे नाव नाव रँकिंग
आयवायएससी 201-250
जामिया मिलिया इस्लामिया 401-500
बनारस हिंदू विद्यापीठ 501-600
आयआयटी इंदूर 501-600
महात्मा गांधी विद्यापीठ 501-600
अलिगढ मुस्लिम विद्यापीठ 601-800

Comments are closed.