World Weightlifting Championships 2025 – हिंदुस्थानच्या लेकीचं घवघवीत यश; मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकत इतिहास रचला

हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा हिंदुस्थानची मान अभिमानाने उंचावली आहे. नॉर्वेतील फोर्डे येथे सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Weightlifting Championships 2025) 48 किलो वजनी गटात मीराबाईने रौप्य पदकावर मोहोर उमटवली आहे. या पदकासह मीराबाई चानू हिंदुस्थानसाठी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पदके जिंकणारी तिसरी वेटलिफ्टर ठरली आहे. यापूर्वी मीराबाईने 2017 साली सुवर्णपदक आणि 2022 साली रौप्यपदक जिंकले आहे.
ऑलिम्पिक विजेत्या मीराबाई चानूने जागतिक चम्पियनशिपमध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. 2017 आणि 2022 नंतर तिन्हे पुन्हा एकदा पदक पटकावत इतिहास रचला आहे. मीराबाईने 48 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 असे एकूण 199 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावले. चीनच्या थान्याथनला मीराबाईने अवघ्या 1 किलोच्या फरकाने पिछाडीवर टाकले. त्यामुळे थान्याथनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तर उत्तर कोरियाच्या री सांग गुमने 213 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.
मीराबाई चनू इतिहास निर्माता!
मीराबाई भारतीय वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक गौरवशाली अध्याय जोडते 🙌
वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२25 (k 48 किलो) येथे तिने एकूण 199 किलो ( + 84 + ११)) चांदीची कमतरता केली.
तिचे तिसरे जगाचे पदक:
🥇 2017 | 🥈 2022 | 🥈 2025सुसंगतता. वर्ग.… pic.twitter.com/4oppoumt8v
– इंडियसपोर्टशब (@इंडियसपोर्टशब) 2 ऑक्टोबर, 2025
मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावत सुवर्ण कामगिरी केली आहे. यापूर्वी हिंदुस्थानच्या कुंजरानी देवी आणि कर्णम मल्लेश्वरी यांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. कुंजरानी देवीने सर्वाधिक सात वेळा (1989, 1991, 1992, 1994, 1995, 1996, 1997) रौप्यपदकं जिंकली आहेत. तर कर्णम मल्लेश्वरीने दोन सुवर्ण (1994, 1995) आणि दोन कांस्य पदके (1993, 1996) जिंकली आहेत.
Comments are closed.