युरोपमध्ये हॅरी पॉटर थीमवरील पहिले हॉटेल

हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेत जगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. जगातील पहिले संपूर्णपणे हॅरी पॉटर थीमवर आधारित हॉटेल लवकरच युरोपमध्ये सुरू होणार आहे. जर्मनीच्या ‘गुनजबर्ग’ शहरातील ‘लेगोलँड डॉयचलँड रिसॉर्ट’मध्ये हे हॉटेल उभारले जात आहे. हे हॉटेल म्युनिक आणि स्टटगार्ट शहरांच्या मध्यभागी स्थित आहे. या हॉटेलमधील प्रत्येक खोलीला हॅरी पॉटरच्या विश्वाची झलक देण्यासाठी विशेष डिझाईन करण्यात आले आहे. हॉटेलचा प्रत्येक कोपरा विझार्ंडग वर्ल्डच्या जादुमय वातावरणाने भरलेला असेल.

Comments are closed.