WPL 2025: गुजरातचा दणदणीत विजय, आरसीबीचा घरच्या मैदानावर सलग तिसरा पराभव

डब्ल्यूपीएल 2025 मध्ये, स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाला गुजरात जायंट्सने 6 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातची कर्णधार अ‍ॅशले गार्डनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला, कारण आरसीबीचा डाव फक्त 125 धावांवर संपुष्टात आला. अ‍ॅशले गार्डनरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने लक्ष्य गाठले.

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सची सुरुवात चांगली झाली नाही. बेन मुनी 11 धावांवर आणि दयालन हेमलता फक्त 11 धावांवर बाद झाले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेली हरलीन देओल फक्त 5 धावा करू शकली. अशा परिस्थितीत गुजरात संघ संकटात सापडलेला दिसून आला. पण त्यानंतर अ‍ॅशले गार्डनर आणि फोबी लिचफिल्ड यांनी त्यांच्या शिस्तबद्ध फलंदाजीने गुजरातला विजय मिळवून दिला. या दोन्ही खेळाडूंनी शानदार फलंदाजी केली. गार्डनरने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 58 धावा केल्या. फोबी फिचफिल्डने 21 चेंडूत 30 धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिली. गार्डनरला तिच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

दुसरीकडे, आरसीबीची फलंदाजी वाईटरित्या फ्लॉप झाली. कर्णधार स्मृती मानधना मोठी खेळी खेळू शकली नाही. ती फक्त 10 धावा करून बाद झाली. अ‍ॅलिस पेरीला तिचे खातेही उघडता आले नाही. रिचा घोषने 9 धावा केल्या. राघवी बिष्ट आणि कनिका आहुजा यांनी काही काळ विकेटवर राहण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगली सुरुवात करून हे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले. कनिका आणि राघवीने आक्रमक फलंदाजी करून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी 37 चेंडूत 48 धावांची भागीदारी केली. कनिकाने लेग-स्पिनर प्रिया मिश्राविरुद्ध सलग चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार मारला.

राघवीने 20 धावा आणि कनिका आहुजाने 33 धावांचे योगदान दिले. जॉर्जिया बेरहॅमने 20 धावा केल्या. तर किम गार्थने 14 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच आरसीबी संघ 100 धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला. गुजरातकडून डिआंड्रा डोटिन आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर अ‍ॅशले गार्डनर आणि काशवी गौतम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. विशेष म्हणजे आरसीबीचा हा सलग तिसरा पराभव आहे.

हेही वाचा-

भारत-पाकिस्तान क्रिकेट संग्राम – 2025 मध्ये 3 वेळा होणार थरारक भिडंत!
क्रिकेटमध्ये मोठा धमाका? अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचणार‌ का?
“क्रिकेट आणि परंपरेचा संगम! भारत-न्यूझीलंड सामन्यात प्रेक्षकांना मोफत इफ्तार बॉक्स”

Comments are closed.