गुजरातचा धुव्वा उडवत मुंबईचा दिमाखात फायनलमध्ये प्रवेश, विजेतेपदासाठी दिल्लीशी सामना

वुमन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिमाखात फायनल गाठली आहे. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात खेळताना मुंबईने गुजरात जायंट्स संघाचा दारुण पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये आता मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे. ब्रेबॉर्न मैदानावर 15 मार्च रोजी हा सामना रंगणार आहेत.
सेमीफायनल लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 4 विकेट्स गमावून 213 धावांचा डोंगर उभारला. डब्ल्यूपीएलमध्ये ही मुंबईची सर्वात मोठी धावसंख्याही ठरली. मुंबईकडून हेली मॅथ्यूज आणि नॅट स्किव्हर ब्रंटने प्रत्येकी 77 धावांचे योगदान दिले. तर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन घडवले आणि अवघ्या 12 चेंडूत 36 धावा चोपल्या.
मुंबईने विजयासाठी दिलेले हे आव्हान पहिल्यांदाच सेमीफायनल गाठलेल्या गुजरातला पेलवले नाही. गुजरातचा संघ दबावात पत्त्यासारखा कोसळला. गुजरातचे सहा फलंदाजच 10 चा आकडाही पार करू शकले नाहीत. सर्वाधिक धावा डॅनियल गिब्सन (34) हिने केल्या. याव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या रचू शकला नाही आणि गुजरातचा डाव 166 धावांमध्ये आटोपला.
फलंदाजीमध्ये कमाल दाखवलेल्या हेली मॅथ्यूज हिने गोलंदाजीतही आपली जादू दाखवली. तिने 3.2 षटकात 31 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. अमिली कर हिने 2, तर शबनम इस्माई आणि नॅट स्किव्हर ब्रंटने प्रत्येकी 1 विकेट घेतली. गुजरातचे तीन बॅटर धावबाद झाले.
7⃣-0⃣, आमचे रेकॉर्ड विरूद्ध दिग्गज अबाधित राहतात 😎#SA #Mumbaiindians #टॅटॉल #एमआयव्हीजीजी pic.twitter.com/nkhure7d8x
– मुंबई इंडियन्स (@मिपाल्टन) मार्च 13, 2025
Comments are closed.