WPL 2026: हरमनप्रीत कौरची दमदार खेळी, अमनजोत-निकोला कॅरीची उत्कृष्ट साथ, मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला.
महिला प्रीमियर लीग 2026 चा सहावा सामना मंगळवारी (13 जानेवारी) नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात जायंट्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि संघाने सोफी डिव्हाईनची (8) विकेट लवकर गमावली. यानंतर बेथ मुनी आणि कनिका आहुजा यांनी डावाची धुरा सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. मुनीने 26 चेंडूत 33 धावा केल्या, तर कनिका आहुजाने 18 चेंडूत 35 धावांची जलद खेळी केली.
Comments are closed.