आरसीबीने यूपी वॉरियर्सचा अवघ्या 12.1 षटकांत धुव्वा उडवला, हॅरिस-मंधानाने झंझावाती खेळी करत खळबळ उडवून दिली.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने धडाक्यात सुरुवात केली. हॅरिस आणि मानधना यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 11.4 षटकात 117 धावांची शानदार भागीदारी केली, ज्यामुळे आरसीबीने 12.1 षटकात 1 गडी गमावून विजय मिळवला. हॅरिसने 40 चेंडूत 212.50 च्या स्ट्राईक रेटने 10 चौकार आणि 5 षटकारांसह 85 धावांची खेळी खेळली. तर मंधानाने 32 चेंडूत 47 धावा केल्यानंतर नाबाद राहिली, ज्यात तिने 9 चौकार मारले.
यूपीकडून शिखा पांडेने एकमेव विकेट घेतली.
Comments are closed.