साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ? लेखन स्पर्धा
सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा विषय ‘साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?’ असा आहे.
साहित्यिक कुणाला म्हणावे, त्याची व्याख्या काय, पुस्तक प्रकाशित झालेलाच साहित्यिक ठरतो का, साहित्यिक ठरवण्याचा अधिकार कुणी कुणाला दिला, पुरस्कार मिळाला हे साहित्यिक असल्याचे प्रमाणपत्र आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यांचा ऊहापोह लेखात व्हावा अशी अपेक्षा आहे. शब्दमर्यादा 500 शब्द असून स्पर्धकाने आपला लेख PDF format मध्ये [email protected] यावर पाठवावा. अंतिम तारीख 15 मार्च 2026 रोजी आहे. विजेत्यांना रोख रकमेची तीन पारितोषिके देण्यात येतील. 27 मार्च रोजी होणाऱया ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’मध्ये पारितोषिक वितरण करण्यात येण्यात आहे.
Comments are closed.