मेलबर्न कसोटी हरली तरी टीम इंडिया जाणार फायनलमध्ये? 1, 2 नव्हे तर तयार झाली 4 समीकरणं, जाणून घ्

WTC अंतिम पात्रता परिस्थिती: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका जसजशी पुढे जात आहे, तसतसे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे समीकरण गुंतागुंतीचे होत आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल 2025 मध्ये फक्त 8 कसोटी सामने बाकी आहेत. यापैकी भारताला फक्त दोन सामने खेळायचे आहेत. भारताला डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये कोणत्याही धोक्याशिवाय जायचे असेल तर त्यांना हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. मात्र यापैकी एक तरी सामना भारताने जिंकला. तरी अंतिम फेरीच्या शर्यतीत टीम इंडिया कायम राहील. म्हणजे मेलबर्न कसोटी हरली तरी टीम इंडिया जाणार फायनलमध्ये जाऊ शकते, असे 4 समीकरणे तयार झाले आहे.

1. भारताने मालिका 2-1 ने जिंकल्यास काय होईल…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आता मेलबर्नमध्ये चौथा आणि सिडनीमध्ये पाचवा कसोटी सामना खेळायचा आहे. जर भारताने यापैकी एक सामना जिंकला आणि मालिका 2-1 ने जिंकली तर त्याचे 55.26 टक्के गुण होतील, जर श्रीलंकन ​​संघाने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत केले तर भारत गुणतालिकेत टॉप-2 मध्ये राहील.

2. भारत आणि ऑस्ट्रेलिया 2-2 ने बरोबरीत राहिल्यास काय होईल…

भारत आणि ऑस्ट्रेलियाने मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांपैकी प्रत्येकी एक सामना जिंकल्यास मालिका 2-2 अशी बरोबरीत संपेल, तरीही टीम इंडियाचे 55.26 टक्के गुण असतील. अशा परिस्थितीतही श्रीलंकेचा संघ भारताला मदत करू शकतो. श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-0 ने जिंकली तर भारत या दोन्ही संघांच्या वरती राहील.

3. भारत आणि ऑस्ट्रेलिया 1-1 ने बरोबरीत राहिल्यास काय होईल…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुढील दोन सामने अनिर्णित राहिले तर मालिका 1-1 अशी बरोबरीत राहील. असे झाल्यास टीम इंडियाचे 53.51 टक्के गुण होतील. या स्थितीतही भारत WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो. यामध्ये पुन्हा श्रीलंकेचा विजय भारताला उपयुक्त ठरणार आहे. श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर 1-0 असा विजय भारताला या दोन संघांपेक्षा चांगल्या स्थितीत ठेवेल.

4. पाकिस्तानमुळे टीम इंडिया जाणार फायनलमध्ये…

श्रीलंकाच नाही तर पाकिस्तानचा विजय भारतासाठीही उपयुक्त ठरणार आहे. उदाहरणार्थ, भारत-ऑस्ट्रेलिया मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आणि पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेला 2-0 ने पराभूत केले, तर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होईल. असे झाल्यास भारत (53.51) गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचेल. अंतिम फेरीतील दुसरा संघ श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलिया असू शकतो, कारण जर दक्षिण आफ्रिका पाकिस्तानकडून 0-2 ने पराभूत झाला तर दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत टॉप-2 मधून बाहेर पडेल.

हे ही वाचा –

India U-19 Women Asia Cup champion : भारताच्या पोरी सर्वांत भारी! अंडर 19 आशिया कपच्या ट्रॉफीवर कोरलं नाव, बांगलादेशला पाणी पाजून घडवला इतिहास

अधिक पाहा..

Comments are closed.