WTC मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या टॉप-5 यादीत 4 भारतीय; सिक्सर किंग कोण?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांची नवी यादी जाहीर झाली असून, त्यात भारतीय फलंदाजांचा दबदबा स्पष्ट दिसून येतो. टॉप-5 मध्ये तब्बल चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, सर्वाधिक षटकारांचा किताब इंग्लंडच्या बेन स्टोक्सने आपल्या नावावर ठेवला आहे.
इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स WTC इतिहासातील सर्वाधिक षटकारवीर ठरला आहे. त्याच्या आक्रमक खेळशैलीमुळे तो या यादीच्या शीर्षस्थानी पोहोचला आहे आणि इतर सर्वांना मागे टाकले आहे.
भारतासाठी WTC मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान विकेटकीपर रिषभ पंतला मिळाला आहे. 69 डावांमध्ये त्याने तब्बल 75 षटकार ठोकले असून, एकूण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंतची ही कामगिरी भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या ‘हिटमॅन’ रोहित शर्माची कामगिरीही तितकीच उल्लेखनीय आहे. रोहितने 69 डावांमध्ये 56 षटकार ठोकत तिसरे स्थान मिळवले आहे. WTC इतिहासात 50 पेक्षा जास्त षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.
सायलेंट परफॉर्मर म्हणून ओळखला जाणारा शुभमन गिल या यादीत चौथ्या स्थानी आहे. 73 डावांमध्ये त्याने 46 षटकार ठोकत टॉप-5 मध्ये जागा निश्चित केली. षटकार हे त्याच्या खेळाचे मुख्य वैशिष्ट्य नसतानाही त्याने उत्तम कामगिरी केली आहे.
भारतीय संघाचा युवा ओपनर यशस्वी जायसवालनेही WTC मध्ये दमदार खेळ दाखवत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जायसवालने आतापर्यंत 43 षटकार ठोकले आहेत.
Comments are closed.