इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानं WTC गुणतालिकेत उलटफेर, टीम इंडियाला फायदा की तोटा?
मेलबर्न: आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2025-27 मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिला पराभव स्वीकारावा लागला आहे. इंग्लंडनं ॲशेसच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनं विजय मिळवला. बॉक्सिंग डे कसोटी केवळ दोन दिवसात संपली. इंग्लंडच्या विजयानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. इंग्लंडच्या विजयानं भारताला थोडा फायदा झाला असला तरी अडचणी देखील वाढू शकतात.
WTC 2025-27 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव
ऑस्ट्रेलियानं ॲशेस मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2025-27 या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव आहे. या पराभवानंतर देखील ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 100 टक्क्यांहून 85.71 वर आली आहे.त्यांच्याकडे 72 गुण आहेत.
न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पराभावाचा सर्वाधिक फायदा न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तानला झाला आहे. भारताला देखील थोड्या प्रमाणात फायदा झाला आहे. भारतानं 9 कसोटी सामने खेळले असून 4 विजय आणि 4 पराभव भारताला स्वीकारावे लागले आहेत, तर एक मॅच ड्रॉ झाल्यानं विजयाची टक्केवारी 48.15 आहे, भारत सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. भारताकडे सध्या 52 गुण आहेत.
जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेत मेलबर्न कसोटीपूर्वी इंग्लंडचा संघ 27.08 पीटीसह सातव्या स्थानावर होता. तर आता त्यांच्याकडे 38 गुण आहेत, त्यांचा पीटीसी 35.19 वर आला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशेस मालिकेतील शेवटची कसोटी सिडनी येथे होणार आहे. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवल्यास त्यांचं पहिलं स्थान आणखी भक्कम होऊ शकतं. तर, इंग्लंडनं सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास भारताच्या सहाव्या स्थानाला धोका निर्माण होऊ शकतो.
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील चार सामने पार पडले आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिल्या तीन कसोटीत इंग्लंडवर विजय मिळवला. तर, चौथ्या कसोटीत इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. मेलबर्नची बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली. इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला चार विकेटनं पराभूत केलं.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 152 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 132 धावा करु शकला. दुसरीकडे इंग्लंडनं पहिल्या डावात 110 केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडनं 6 बाद 178 धावा करत कसोटीत विजय मिळवला. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स यानं चौथ्या कसोटीतील विजय विशेष असल्याचं म्हटलं.
आणखी वाचा
Comments are closed.