दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव; टीम इंडियाचं WTC चं गणित बिघडलं, Points


WTC 2025-27 पॉइंट टेबल नंतर दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला: कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 30 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या दिवशी भारतास विजयासाठी 124 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण भारतीय संघ फक्त 93 धावांवर ऑलआऊट झाला आणि टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-27 Points Table) 2025–27 च्या गुणतालिकेवरही झाला असून भारत आता चौथ्या स्थानावर घसरला आहे.

WTC पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची मोठी घसरण

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारत तिसऱ्या स्थानावर होता. मात्र कोलकाता कसोटीमधील पराभवानंतर भारत चौथ्या स्थानावर घसरला असून त्यांचे गुण टक्केवारी आता 54.17 आहे. भारताने या चक्रात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यात 4 विजय आणि 3 पराभव झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेची चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी…

दुसरीकडे, कोलकाता कसोटी मधील विजयामुळे दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. त्यांनी या चक्रात आतापर्यंत 3 सामने खेळले असून 2 विजय आणि 1 पराभवामुळे त्यांची गुण टक्केवारी 66.67 आहे.

ऑस्ट्रेलिया टेबल टॉपर, तर श्रीलंका तिसऱ्या स्थानी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025–27 गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 100% गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर श्रीलंका 66.67% गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान 50% गुणांसह पाचव्या, तर इंग्लंड 43.33% गुणांसह सहाव्या स्थानी आहे. अंतिम तीन स्थानी बांगलादेश, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. त्यापैकी न्यूझीलंडने अद्याप या चक्रातील एकही सामना खेळलेला नाही.

हे ही वाचा –

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी भारताला लोळवलं, नाकावर टिच्चून पहिला कसोटी सामना जिंकला; गंभीरचं तोंड पडलं

आणखी वाचा

Comments are closed.