1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात ‘या’ स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी

<एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : शेअर बाजारात घसरणीचं सत्र असताना बिर्ला ग्रुपच्या एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु आहे. एक्सप्रो इंडियाचा शेअर 9 टक्क्यांनी वाढून 1248.80 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. एक्सप्रो इंडियाचा शेअर गेल्या पाच वर्षात 7400 टक्के वाढला आहे. एक्सप्रो इंडिया शेअर 16 रुपयांपासून 1200 रुपयांच्या पुढं पोहोचला आहे. एकस्प्रो इंडियाचा शेअर गेल्या 52 आठवड्यांमध्ये उच्चांकी पातळीवर 1675.55 रुपयांवर होता तर या कालावधीतील निचांकी पातळी 867.10 रुपये होता. 

1 लाखांचे बनले 75 लाख रुपये

एक्स्प्रो इंडिया कंपनीचा शेअर 14 फेब्रुवारी 2020 ला 16.63 रुपये होता. एक्सप्रो इंडिया कंपनीचा शेअर आज (12 फेब्रुवारी) ला 1248.80 रुपयांवर आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षात या शेअरनं 7400 टक्के वाढला आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे 14 फेब्रुवारी 2020 ला एक्सप्रो इंडिया कंपनीचे  1 लाख रुपयांचे शेअर असतील. संबंधित व्यक्तीनं त्याची ती गुंतवणूक कायम ठेवली असेल तर आतापर्यंत  त्या 1 लाख रुपयांचे 75 .09 लाख रुपये झाले असते. यामध्ये कंपनीकडून देण्यात आलेल्या बोनस शेअरच्या मूल्याचा समावेश नाही. 

कंपनीनं वाटले बोनस शेअर

एक्सप्रो इंडियानं त्यांच्या भागधारकांना बोनस शेअर दिले आहेत.  1 जुलै 2022 ला कंपनीनं  दोन शेअर मागं एक शेअर असं शेअरचं वाटप केलं होतं. गेल्या चार  वर्षात एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये 3360 टक्क्यांची वाढ झाली आहे. 12 फेब्रुवारीला 2021 ला या कंपनीचा शेअर 35.97 रुपयांवर होता. तर, 12 फेब्रुवारीला  शेअर 1248.80 रुपयांवर आहे. गेल्या दोन वर्षात एक्सप्रो इंडियाचा शेअर 120 टक्क्यांनी वाढला आहे. 

शेअर बाजार सावरला 

भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांमध्ये घसरणीचा ट्रेंड सुरु होता. दोन्ही दिवसात शेअर एक हजार अंकांनी घसरला होता. निफ्टी 50  90 अंकांनी, बँक निफ्टी 90 आणि  सेन्सेक्स 325.91 अंकांनी घसरुन ट्रेड करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं आयातीवर टॅरिफ लादण्याचं धोरण, विदेशी गुंतवणूकदारांकडून केली जाणारी विक्री, रुपया कमजोर होणं या सर्वांचा परिणाम झाल्यानं शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत होतं. आज सेन्सेक्स अन् निफ्टी सावरला आहे. 

इतर बातम्या :

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/photo-gallery/business/gold-late-down-by-1500-rupee-on- moliti-commodity-exchange-rate- all-by-Marathi-news- 1343897">Gold Rate : गुड न्यूज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 1500 रुपयांनी घसरलं, चांदीचे दर घटले, गुंतवणूकदारांचा मोठा निर्णय

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Comments are closed.