अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या RCB खेळाडूने गुपचूप केले लग्न

यश दयालने श्वेता पुंडीरशी लग्न केले: आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी यश दयालने (Yash Dayal) आयुष्यातील मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने अचानक लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. यशने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी श्वेता पुंडीर (Shweta Pundir) हिच्यासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, यश दयाल आणि श्वेता पुंडीर यांचे लग्न 4 फेब्रुवारी रोजी पार पडले. या लग्नसोहळ्यात केवळ दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. बराच काळ ही गोष्ट गुपित ठेवण्यात आली होती आणि नंतर स्वतः यशने सोशल मीडियावरून त्याची माहिती दिली.

अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण अन्….

मात्र, यापूर्वी यश दयालवर गंभीर आरोपही झाले होते. जयपूरमधील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने त्याच्यावर दोन वर्षे ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सांगानेर सदर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध FIR नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर गाझियाबादमधील एका महिलेनंही लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयने जानेवारी महिन्यात यश दयालला अंतरिम जामीन दिला होता. त्यानंतर यशने न्यायालयात आणखी एक स्वतंत्र याचिका दाखल केली होती. या सर्व घडामोडींनंतर आता त्याने शांतपणे लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

श्वेता पुंडीर कोण आहे? (Who is Shweta Pundir?)

श्वेता पुंडीर ही दिल्लीतील रहिवासी असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि व्लॉगर म्हणून ओळखली जाते. इंस्टाग्रामवर तिचे सुमारे 6 लाख फॉलोअर्स आहेत. याशिवाय तिने इंटरकॉन्टिनेंटल लिजेंड्स लीगमध्ये ब्रॉडकास्टर्ससोबतही काम केले. इंस्टाग्रामवरील बायोमध्ये ती स्वतःला आर्टिस्ट, कंटेंट क्रिएटर आणि व्लॉगर म्हणून ओळख करून देते.

RCB कडून यश दयाल आय.पी.एल

दरम्यान, आयपीएल 2026 मध्ये यश दयाल पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. फ्रेंचायझीने त्याला यंदाच्या हंगामासाठी 5 कोटी रुपयांत रिटेन केले आहे. यशने 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

2023 च्या हंगामात रिंकू सिंगयाने त्याच्या एका षटकात सलग पाच षटकार ठोकले होते, ज्यामुळे यश दयाल चर्चेत आला. मात्र त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन करत स्वतःला सिद्ध केले. 2024 मध्ये भारत-बांगलादेश कसोटी मालिकेसाठी त्याची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली होती, पण त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळालेली नाही.

हे ही वाचा –

Sarfaraz Ahmed Retires : ज्याने भारताला हरवून पाकिस्तानला ICC चॅम्पियन बनवलं; त्याच सरफराज अहमदने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, नेमकं कारण काय?

आणखी वाचा

Comments are closed.