यशस्वी भव: सचिन-विराटला मागे टाकत जयस्वालने रचला इतिहास!

यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. बर्मिंगहॅम कसोटीच्या दुसऱ्या डावात 10धावा काढताच त्याने हा विक्रम रचला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत जयस्वाल आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने 40 डावांमध्ये हा टप्पा गाठला, पण इतक्या डावांमध्ये 2000 धावा पूर्ण करणारा तो एकमेव फलंदाज नाही. त्याच्या आधी वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनीही इतक्याच डावात दोन हजार धावांचा आकडा गाठला होता.

राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग, दोघांनीही 40 डावात 2000 कसोटी धावा पूर्ण केल्या. आता जयस्वालनेही त्याच डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात 87 धावा काढल्यानंतर जयस्वाल बाद झाला, ज्यामुळे तो 39 डावांमध्ये 2000 धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त 10 धावा दूर होता. जर त्याने पहिल्या डावात आणखी 10 धावा केल्या असत्या तर तो कसोटीत 2000 धावा करणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज बनला असता. या यादीत विराट कोहली जयस्वालच्या जवळपासही नाही, ज्याने 53 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या.

यशस्वी जयस्वाल – 40 डाव
राहुल द्रविड – 40 डाव
वीरेंद्र सेहवाग – 40 डाव
विजय हजारे – 43 डाव
गौतम गंभीर – 43 डाव

यशस्वी जयस्वाल आता 2000 कसोटी धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण दुसरा भारतीय फलंदाजही बनला आहे. त्याने 23 वर्षे आणि 188 दिवसांच्या वयात हा टप्पा गाठला आहे. 2000 कसोटी धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर होता, ज्याने 20 वर्षे आणि 330 दिवसांच्या वयात दोन हजार धावा पूर्ण केल्या.

Comments are closed.