IND vs ENG: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालने रचला इतिहास! 50 वर्षांनंतर असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय सलामीवीर

Yashasvi Jaiswal created history: यशस्वी जयस्वालने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इतिहास रचला आहे. यशस्वीने चौथ्या कसोटी सामन्यात असा पराक्रम केला आहे, जो गेल्या 50 वर्षांपासून कोणताही भारतीय सलामीवीर करू शकला नव्हता. भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजाने उत्कृष्ट फलंदाजी करत 58 धावांची दमदार खेळी केली. यशस्वीने केएल राहुलसोबत भारतीय संघाला शानदार सुरुवात दिली आणि पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचली. आपल्या खेळीदरम्यान यशस्वीने 10 चौकारांसह 1 षटकार मारला. (Yashasvi Jaiswal Old Trafford record)

यशस्वी जयस्वाल मँचेस्टरच्या या मैदानावर गेल्या 50 वर्षांत अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून अखेरचे अर्धशतक 1974 मध्ये सुनील गावस्करांच्या बॅटमधून आले होते. यशस्वीने आपल्या डावाची सुरुवात सावधपणे केली आणि सुरुवातीला तो एकेरी धावा घेऊन आपली खेळी पुढे नेताना दिसला. पण, 20 धावांचा टप्पा पार केल्यानंतर या सलामीच्या फलंदाजाने हात मोकळे केले. यशस्वीने 107 चेंडूंना सामोरे जात 58 धावांची दमदार खेळी केली. (Indian opener fifty Manchester)

जयस्वालने आपल्या या डावादरम्यान इंग्लंडविरुद्ध कसोटीत 1 हजार धावा (1000 Test Runs against England) देखील पूर्ण केल्या आहेत. इंग्लिश संघाविरुद्ध सर्वात वेगाने 1 हजार धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. डाव्या हाताच्या या फलंदाजाने कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध खेळलेल्या 16 डावांमध्ये आतापर्यंत 66च्या सरासरीने 1,003 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 3 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. यशस्वीने 2 दुहेरी शतके देखील झळकावली आहेत. (Yashasvi Jaiswal 1000 Test runs England)

Comments are closed.