यशस्वीच्या रनआऊटवरुन मोठा वादंग, लोकांनी गिलला जबाबदार धरलं, जयस्वाल समोर येत म्हणाला…
दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसरा दिवसाचा खेळं संपेपर्यंत भारतानं सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे. वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात 4 बाद 140 धावा केल्या आहेत. दुसरीकडे भारतानं पहिला डाव 5 बाद 518 धावांवर जाहीर केला. 2 बाद 318 वरुन भारतानं फलंदाजी सुरु करताच यशस्वी जयस्वाल 175 धावांवर धावबाद झाला. विकेट गेल्यानंतर यशस्वी जयस्वाल नाराज दिसून आला. तो बाद झाल्यानंतर काहीतरी बोलत असल्याचं दिसून आलं. या संपूर्ण प्रकरणावर यशस्वी जयस्वालनं प्रतिक्रिया दिली आहे.
यशस्वी जयस्वालनं 173 धावांवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केली. आज 2 धावा केल्यानंतर जयस्वाल धावबाद झाला. जयस्वालनं मिड ऑफकडे बॉल मारला आणि धावत सुटला. शुभमन गिलनं धाव घेण्यास नकार दिला. यामुळं जयस्वाल परत क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही. यामुळं तो धावबाद झाला. सोशल मीडियावर काही जणांनी शुभमन गिलला तर काही जणांनी यशस्वी जयस्वालला जबाबदार धरलं आहे. आता यशस्वी जयस्वालनं या रनआऊटवर प्रतिक्रिया दिली आहे.
मी नेहमीच मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करतो, मी जर मैदानावर असेल तर स्कोअरबोर्ड पुढं गेला पाहिजे. रनआऊट खेळाचा भाग आहे, त्याबद्दल काही वाटत नाही. डोक्यात एकच असतं की मी काय मिळवू शकतो आणि माझ्या टीमचं ध्येय काय आहे, असं यशस्वी जयस्वाल म्हणाला.
यशस्वी जयस्वाल पुढं म्हणाला की मी जर एक तास पिचवर असेन तर त्यानंतर धावा करणं सोपं जात. दुर्दैवानं तो दुसऱ्या दिवशी काही मिनिटं पिचवर राहू शकला. यशस्वी जयस्वाल 175 धावांवर बाद झाला.
भारताच्या डाव्याच्या 92 व्या ओव्हरमध्ये जेडन सील्स गोलंदाजी करत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर जयस्वालनं मिड ऑफच्या दिशेनं बॉल मारला. यानंतर जयस्वालनं धाव घेण्यासाठी क्रीज सोडलं. जयस्वाल अर्ध्याहून अधिक अंतर पार करुन आला होता. मात्र, शुभमन गिलं क्रीज सोडलेलं नव्हतं. टॅगनरीन चंदरपॉल यानं थेट थ्रो विकेटकीपर टेविन इमलाच याच्या दिशेन केला आणि जयस्वाल रन आऊट झाला.
दरम्यान, भारतानं 5 बाद 518 धावांवर पहिला डाव घोषित केला. शुभमन गिलनं नाबाद 129 धावा केल्या.
Yashasvi Jaiswal speaks on his runout 🎙️#Yashasvijaisval#शबमंगिल #Indvwi pic.twitter.com/5ub0rm74ow
– त्याची श्रुती (@Shruti_v31) 11 ऑक्टोबर, 2025
आणखी वाचा
Comments are closed.