यशस्वी की शुबमन गिल? आशिया कपमध्ये कोणाला मिळणार संधी? आकाश चोप्रा यांनी दिले उत्तर
9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ला सुरुवात होत आहे. भारतीय संघाने तयारीला सुरुवात केली असली तरी बीसीसीआयने अद्याप अधिकृत संघ जाहीर केलेला नाही. दरम्यान, अनेक खेळाडूंनी संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी पक्की केली आहे. सलामी फलंदाज म्हणून शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनीही जोरदार दावा ठोकला आहे. मात्र या दोघांपैकी कोणाचे पारडे जड आहे? याचे उत्तर आकाश चोप्रा यांनी दिले आहे.
आकाश चोप्राच्या मते, आशिया कप 2025 साठी शुबमन गिलपेक्षा यशस्वी जयस्वालची दावेदारी अधिक मजबूत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना त्यांनी सांगितले की टी20 च्या आकडेवारीनुसार यशस्वी थोडा पुढे आहे. तो ज्या पद्धतीने टी२० खेळतो, ती शैली भारतीय संघाच्या डीएनएला साजेशी आहे. कधी कधी अशी वेळही येते की, जर तुम्ही शुबमनला तिसरा ओपनर म्हणून निवडले, जो तुमचा कसोटी कर्णधार आहे, वनडे उपकर्णधार आहे. आणि मग त्याला टी20 मध्ये बेंचवर बसवले, तर ते चांगले दिसत नाही.
टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे भारतासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये फलंदाजी करताना दिसले आहेत. दोघांनीही सलामी फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. मात्र आता आशिया कपसाठी भारतीय निवड समिती कोणत्या खेळाडूंवर विश्वास दाखवते, हे येणारा काळच ठरवेल.
Comments are closed.